Monday, July 13, 2026
Homeनागपूरग्राहक तक्रार निवारण आयोगाचा सहकारी पतसंस्थेला दणका... - तक्रारकर्त्या ग्राहकाचे ३ लाख...

ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा सहकारी पतसंस्थेला दणका… – तक्रारकर्त्या ग्राहकाचे ३ लाख ९५ हजार रुपये ९ टक्के व्याजासह परत करण्याचे दिले आदेश…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-ग्राहकाची फसवणूक केल्यामुळे हरीओम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची जोरदार चपराक बसली असून आयोगाने तक्रारकर्त्या ग्राहकाचे ३ लाख ९५ हजार ३०२ रुपये ९ टक्के व्याजासह परत करा; असा आदेश पतसंस्थेला दिला.
हे व्याज ११ जुलै २०१८ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे.ही रक्कम देण्यासाठी पतसंस्थेला ४५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.त्यानंतर या रकमेवर १२ टक्के व्याज लागू होईल,असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.याशिवाय,तक्रारकर्त्याला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ३० हजार व तक्रार खर्चापोटी १० हजार रुपये भरपाईदेखील मंजूर करण्यात आली आहे.ही रक्कम पतसंस्थेनेच द्यायची आहे.
राजकुमार चोपकर,असे तक्रारकर्त्याचे नाव असून ते नागपूरच्या नंदनवन येथील रहिवासी आहेत. त्यांना आयोगाचे मिलिंद चोपकर,अध्यक्ष सतीश सप्रे व सदस्य केदार यांनी हा दिलासा दिला.यांनी या पतसंस्थेत बचत खाते सुरू केले होते.त्यामध्ये मोठी जमा झाल्यानंतर ते मुदत ठेव रक्कम करीत होते. दरम्यान,त्यांनी परिपक्व झालेल्या मुदत ठेवीची रक्कम मागितली असता पतसंस्थेने टाळाटाळ केली. तसेच,मुदत ठेवमधील रक्कम त्यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता बचत खात्यात वळती केली.११ जुलै २०१८ पर्यंत या खात्यामध्ये ३ लाख ९५ हजार ३०२ रुपये जमा झाले होते.ती रक्कम त्यांना परत देण्यात आली नाही.तसेच,पतसंस्थेने कायदेशीर नोटीसलाही प्रतिसाद दिला नाही.परिणामी,चोपकर यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती.पतसंस्थेने सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे तक्रारकर्त्यास त्याची हक्काची रक्कम मिळाली नाही व तो रकमेच्या उपभोगापासून वंचित राहिला.करिता,तक्रारकर्ता दंडात्मक व्याजासह रक्कम मिळण्यास पात्र आहे. तसेच,पतसंस्थेने तक्रारकर्त्याला त्याची कायदेशीर रक्कम थकवून शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यासाठी तक्रारकर्ता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यासही पात्र आहे; असे निरीक्षण आयोगाने निर्णयात नोंदविले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!