- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :- ‘दारू साठी वाट्टेल ते..!’ दारू विक्रीसह दारू पिणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे.हल्ली युवा पिढीत दारू पिण्याचा ट्रेण्ड वाढलेला दिसून येतो.पार्टी,लग्न समारंभ,विविध कार्यक्रम व इतर मेजवाण्यांमध्ये दारू शिवाय अनेकांना जमेना..! असे झाले असले तरी दारूचे व्यसन दरवर्षी २६ लाख लोकांच्या मृत्यूचे कारण बनत आहे.जगात होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी ४.७ टक्के लोकांचा मृत्यू दारूमुळे होतो.म्हणजे प्रत्येक २० मृत्यूपैकी एकाच्या मृत्यूचे कारण दारू आहे.ड्रग्ज आणि नशेच्या औषधांमुळे होणारे मृत्यूंचे आकडे यात जोडले तर हा आकडा वाढून ३० लाखपिक्षा जास्त होतो. विशेष म्हणजे मृत्यूचे हे बहुतांश आकडे पुरुषांचे आहेत. आकडेवारीनुसार,वर्षाला २० लाख पुरुषांचा दारूमुळे तर वर्षाला चार लाख पुरुषांचा ड्रग्जमुळे मृत्यू होतो. जगभरात दारूच्या एकूण विक्रीसाठी तीनचतुर्थांश पुरुष जबाबदार आहेत. ही माहिती जागतिक आरोग्य संघटनेचा (डब्ल्यूएचओ) नवीन अहवाल ‘ग्लोबल स्टेट्स रिपोर्ट ऑन अल्कोहोल अॅण्ड हेल्थ अॅण्ड ट्रिटमेंट ऑफ सब्सटेन्स यूज डिसऑर्डर’मधून समोर आली आहे.दारूच्या सेवनामुळे यकृताचे आजार तसेच कर्करोगासह अनेक आजार उद्भवतात. अहवालानुसार,दारू आणि अमली पदार्थांच्या आहारी जाणाऱ्यांत २० ते ३९ वयोगटातील तरुणांचा सर्वाधिक समावेश आहे.युरोप आणि आफ्रिकी देशांत दारूमुळे सर्वाधिक मृत्यू झाले.यामध्ये पुरुषांचा समावेश जास्त आहे.मद्यप्रेमींना विविध आजार दारूमुळे अविकसित, गरीब देशांत मृत्यूची संख्या जास्त तर विकसित देशात हा दर कमी आहे. जगभरात चाळीस कोटी लोक म्हणजे सात टक्के लोकसंख्या दारू आणि अमली पदार्थांमुळे होणाऱ्या आजाराने ग्रस्त आहे.यातील २०.९ कोटी लोक दारूमुळे होणाऱ्या विविध आजारांचा सामना करत आहेत.दारूमुळे लोकांना टीबी,एड्स, न्यूमोनिया अशा रोगांचा धोकासुद्धा वाढतो. डब्ल्यूएचओने सांगितले की,दारूमुळे होणाऱ्या मृत्यूदरात घट झाली मात्र अजून ही संख्या खूप मोठी आहे.२०१० ते २०१९ च्या आकड्यांवर नजर टाकली तर जगभरात प्रतिलाख लोकांमागे दारूमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत २०.२ टक्क्यांची घट झाली.प्रतिव्यक्ती दारूची विक्री पाहिली तर युरोप आणि अमेरिकी राष्ट्रांत सर्वात जास्त आहे.जागतिक स्तरावर अनेक जण दिवसातून दोनदा दारू पितात.मात्र हे अनेक आजारांना निमंत्रण देणारे आहे.
- Advertisement -

