Wednesday, August 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता शाकाहारी जेवणासाठी ११० रुपये तर मांसाहारी जेवण १४० रुपये... -...

आता शाकाहारी जेवणासाठी ११० रुपये तर मांसाहारी जेवण १४० रुपये… – विधानसभा निवडणुकीसाठी खर्चाचे दरपत्रक जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-विधानसभा निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरु झाली असून प्रचाराचा नारळ फुटला आहे.उमेदवारांकडून प्रचारासाठी केल्या जाणाऱ्या खर्चावर निवडणूक आयोगाचा वॉच असणार आहे.प्रचारात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे दर निवडणुक आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून शाकाहारी जेवणासाठी ११० रुपये तर मांसाहारी जेवण १४० रुपये आणि चहासाठी १० रुपये तर वडापावसाठी १५ रुपये असे दर ठरवण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगाने प्रचार खर्चाचे दरपत्रक जाहीर केले आहे. यात अगदी चहा,नाश्त्यापासून ते बैठक,रॅली,सभा, जाहिराती,पोस्टर,वाहनांचा खर्च देखील समाविष्ट आहे.उमेदवारांना हा सर्व खर्च निवडणूक आयोगाच्या अधीन राहून करावा लागणार आहे.निवडणुक आयोगाने जारी केलेल्या दरपत्रकापेक्षा अधिकचा खर्च करून आचारसंहितेचा भंग केल्यास उमेदवारांवर कारवाई करण्यात येईल,असा इशारा निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे.
१.चहा – १० रुपये, कॉफी १२ रुपये, नाष्टा ३८ रुपये, वडापाव-१५ रुपये, शाकाहारी जेवण- ११० रुपये, मांसाहारी जेवण-१४० रुपये,पुलाव ७५ रुपये,पुरी भाजी-६० रुपये,पाणी जार (२० लिटर)८० रुपये.
२. नॉन एसी हॉटेल-१६५० रुपये,एसी हॉटेल- ३ हजार रुपये,फोर स्टार हॉटेल सूट- २० हजार रुपये,फाईव्ह स्टार हॉटेल सूट- ५० हजार रुपये.
३. प्लॅस्टिक खुर्ची प्रतिदिन-१० रुपये, यु पिन बॉक्स-६
रुपये,काडे पेटी-१ रुपये,जनरेटर १२५ केव्ही-१५
हजार रुपये प्रतिदिन,व्हीव्हीआयपी बुके १ हजार
रुपये,व्हीआयपी पुष्पहार १२ फुटी डबल- २ हजार
रुपये,पार्टी झेंडा (एक फुट) प्रतिनग-२५ रुपये,पार्टी
झेंडा (दोन फुट) प्रतिनग-५० रुपये,टोपी प्रतिनग-
१२ रुपये,स्कार्फ प्रतिनग-१० रुपये,ढोल-ताशा
पथक प्रति व्यक्ती-१ हजार रुपये,बँड पथक-१२०० रुपये.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!