Sunday, September 6, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज शहरातील शहजाद खान पठाण यांना आचार्य पदवी बहाल...

देसाईगंज शहरातील शहजाद खान पठाण यांना आचार्य पदवी बहाल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज शहरातील निवासी शहजादखान मोहम्मदखान पठाण यांना नुकतीच वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील वाणिज्य या विषयात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे आचार्य पदवी (Ph.D) बहाल करण्यात आली आहे.
शिवरामजी मोघे महाविद्यालयातील प्रा.डॉ.मारोती बी.राठोड यांच्या मार्गदर्शना खालील ”गडचिरोली जिल्ह्याच्या आर्थिक विकासात सूरजागड लोह प्रकल्पाचे योगदान एक चिकित्सक अध्ययन” (कालावधी २०१०-२०११ ते २०१९-२०२०) या विषयावर संशोधन केंद्र शिवरामजी मोघे कला,विज्ञान व वाणिज्य महावि्यालय पांढरकवडा ता.केळापूर जि.यवतमाळ अंतर्गत त्यांनी संशोधन कार्य पूर्ण केले.
गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड लोह प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती,विकासात्मक कामे व विविध विषयांवर उत्कृष्ट अध्ययन केल्याने शहजाद खान पठाण यांना विद्यापीठातर्फे आचार्य पदवी बहाल करण्यात आली.
शहजाद खान पठाण यांना आचार्य पदवी (Ph.D) बहाल करण्यात आल्याने सगळीकडून त्यांना अभिनंदनचा वर्षाव केला जातो आहे.शहजाद यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक प्रा.डॉ.राधेश्याम पी. चौधरी,प्रा.डॉ.अरुण एन.दसोडे,प्रा.डॉ.नागसेन शंभरकर,प्रा.अशपाक सय्यद,संशोधन केंद्र शिवरामजी मोघे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि प्राचार्य डॉ. अजय सोळंके,प्राध्यापक वृंद,आईवडील,आप्तस्वकीय तथा मित्रमंडळी यांना दिले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!