Friday, June 19, 2026
Homeगडचिरोली३४९ गावांमध्ये हत्तीरोग दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम..

३४९ गावांमध्ये हत्तीरोग दूरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-हत्तीरोग दूरीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी व्यापक जनजागृती करावी.तसेच आरोग्य यंत्रणेसोबतच स्थानिक लोकप्रतिनिधी,प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेऊन त्यांना मोहिमेत सक्रियपणे सहभागी करून घ्यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
हत्तीरोग दूरीकरणासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गडचिरोली जिल्ह्यात १० ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे.या मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आज,गुरुवार २९ जानेवारी रोजी पार पडली.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत शिंदे,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.सुजिता वाडिवे उपस्थित होते.
हत्तीरोग हा दीर्घकालीन आजार असून तो व्यक्तीची शारीरिक तसेच मानसिक क्षमता मोठ्या प्रमाणावर कमी करतो.क्युलेक्स जातीच्या डासांमार्फत पसरत असलेल्या कृमी संसर्गामुळे हा आजार होतो.या आजाराची लक्षणे दिसून येण्यासाठी १० ते १५ वर्षांचा कालावधी लागू शकतो.त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वर्षातून एकदा हत्तीरोगविरोधी औषधोपचार करण्याची शिफारस जागतिक स्तरावर करण्यात आली आहे.ही मोहीम गडचिरोली व चामोर्शी या दोन तालुक्यांतील एकूण ३४९ गावांमध्ये राबविण्यात येणार असून,यासाठी ८२० प्रशिक्षीत आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.हे कर्मचारी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पात्र नागरिकांना औषध देणार आहेत.मोहिमेत ट्रिपल ड्रग थेरपी अंतर्गत आयव्हरमेक्टिन,डीईसी व अल्बेंडॅझोल ही औषधे देण्यात येणार आहेत.या औषधोपचारातून दोन वर्षांखालील मुले,गरोदर महिला तसेच अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेले गंभीर रुग्ण यांना वगळण्यात आले असून, अशा व्यक्तींना औषधे देऊ नयेत,अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
औषध सेवनाच्या मात्रेबाबत माहिती देतांना आरोग्य विभागाने सांगितले की,आयव्हरमेक्टिनची मात्रा लाभार्थ्याच्या उंचीनुसार निश्चित करण्यात आली आहे. ९० ते ११९ सें.मी.उंचीसाठी १ गोळी,१२० ते १४० सें.मी.साठी २ गोळ्या,१४१ ते १५८ सें.मी.साठी ३ गोळ्या आणि १५९ सें.मी.पेक्षा अधिक उंची असलेल्या व्यक्तींना ४ गोळ्या दिल्या जातील.डीईसी व अल्बेंडॅझोलची मात्रा वयानुसार निश्चित करण्यात आली असून,२ ते ५ वर्षे वयोगटासाठी प्रत्येकी १ गोळी,६ ते १४ वर्षे वयोगटासाठी डीईसीच्या २ व अल्बेंडॅझोलची १ गोळी,तर १५ वर्षांवरील नागरिकांसाठी डीईसीच्या ३ व अल्बेंडॅझोलची १ गोळी देण्यात येणार आहे.
नागरिकांनी ही औषधे रिकाम्या पोटी घेऊ नयेत तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखालीच औषध सेवन करावे,असे आवाहन करण्यात आले आहे. मोहिमेची व्याप्ती वाढविण्यासाठी २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान विशेष बूथ ॲक्टिव्हिटी राबविण्यात येणार असून,त्यानंतर सुटलेल्या पात्र व्यक्तींसाठी २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान मॉप-अप राऊंड घेण्यात येईल,अशी माहिती डॉ.सुजिता वाडिवे यांनी यावेळी दिली.
औषधांचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हास्तरावर शीघ्र प्रतिसाद पथके तैनात ठेवण्यात येणार असून,एकही पात्र नागरिक या मोहिमेतून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पंडा यांनी दिल्या.बैठकीस आरोग्य विभागासह महिला व बालकल्याण,शिक्षण व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!