Friday, June 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त१४ हजार २३७ ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक राज..

१४ हजार २३७ ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक राज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत.अश्यातच राज्यातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ येत्या फेब्रुवारी महिन्यात संपुष्टात येणार आहे.त्यातच,कार्यकाळ संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका किमान सहा महिने तरी होणार नाहीत.त्यामुळे जानेवारी २०२६ पासून डिसेंबर २०२६ पर्यंतच्या काळात कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने नुकतेच काढले आहे.यावर १४ ऑगस्ट २०२० च्या शासन आदेशानुसार प्रशासकाची नियुक्ती होणार आहे.तसे आदेश ग्रामविकास विभागाचे अप्पर सचिवांनी काढले असून जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी व  जिल्हाधिकाऱ्यांना निर्गमित करण्यात आले आहेत.त्यानुसार,राज्यातील तब्बल १४ हजार २३७ ग्रामपंचायतींवर प्रशासक राज येणार आहे.यात नागपूर विभागातील १ हजार ५०८ ग्रामपंचायती,पुणे विभागात २ हजार ८७० ग्रामपंचायती,अमरावती विभागात २ हजार ४५१ ग्रामपंचायती,नाशिक विभागात २ हजार ४७६ ग्रामपंचायती,छत्रपती संभाजीनगर विभागात ४ हजार १३४ ग्रामपंचायती तर कोकण विभागातील ७९८ असे एकूण १४ हजार २३७ ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकाकडे जाणार आहे.विशेष म्हणजे,शासन अधिकारी,कर्मचाऱ्यांकडे कारभार सोपविणार आहे; तर दुसरीकडे गावगाडा हाकणारी संघटना सरपंच तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनाच प्रशासक नेमण्याची मागणी करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!