Tuesday, June 23, 2026
Homeदेसाईगंज २३४४ रुपये प्रतिक्विंटल बोनस स्वरुपात शेतकऱ्यांना प्रदान करावी…-माजी आमदार डॉ.रामकृष्ण मडावी…   ...

 २३४४ रुपये प्रतिक्विंटल बोनस स्वरुपात शेतकऱ्यांना प्रदान करावी…-माजी आमदार डॉ.रामकृष्ण मडावी…           

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- शेतीसाठी लागवड करण्याकरिता लागणारा खर्च आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीचा विचार करुण महाराष्ट्र शासनाने केन्द्र सरकारकडे ४६६१ रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा; अशी शिफारस केली.या वर्षी धानाच्या हमिभावात ११७ रुपयाची वाढ केली असली तरी यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारु शकत नाही.हमी भाव आणि प्रस्तावित किंमतीची मागणी यातील तफावत महाराष्ट्र सरकारने बोनस स्वरुपात शेतकऱ्यांना प्रदान करावी;अशी मागणी माजी आमदार डॉ.रामकृष्ण मडावी यांनी आज,शुक्रवारी देसाईगंज विश्राम गृहात पार पडलेल्या पत्रपरिषदेत केली आहे.        

वाढते मजुरीचे दर,खताचे दर आणि लागणारा एकुण खर्च यामुळे शेती व्यवसाय करणे शेतकऱ्यांना न परवडण्या सारखे झाले आहे.यावर विचार मंथन करुन महाराष्ट्र सरकारने धानाला प्रतिक्विंटल ४६६१ रुपये किंमत द्यावी; असा अहवाल केन्द्र सरकार  ला पाठवला,केन्द्र सरकारने एमएसपी दरात ११७ रुपयाची वाढ केली आहे.मात्र,एवढ्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुदृढ होऊ शकत नाही.आताची हमीभाव किंमत २३१७ व शासनाने प्रस्तावित केलेली ४६६१ या दरातील असलेली तफावत रुपये २३४४  प्रतिक्विंटल प्रमाणे बोनस स्वरुपात शेतकऱ्यांना प्रदान करावी; अशी मागणी माजी आम.डॉ रामकृष्ण मडावी यांनी पत्रपरिषदेत केली.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाने प्रामाणिकपणे आघाडी धर्म पाळुन काम केले आहे.या विधानसभेत हरिराम वरखडे यांचेसह मी दोनदा या विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे.त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आरमोरी विधानसभेची जागा उबाठा शिवसेना पक्षालाच मिळावी; अशी मागणी कार्यकर्त्यांची असुन कार्यकर्त्यांच्या भावनांचा पुर्ण:ता आदर केला जाईल,असेही या प्रसंगी डॉ. रामकृष्ण मडावी यांनी नमुद केले.

या पत्रपरिषदेला शिवसेना उबाठा चे जेष्ठ नेते गोपाल चौधरी,माजी नगराध्यक्ष शरद तुमाने,दशरथ पिलारे, कल्पना तिजारे,देवराव बेदरे,किरन शालिग्राम,रामदास दहिकर,सुनिल बांगरे,नरेश हिरापुरे,मिनाक्षी मारबते, श्रृतीका बागडे,अक्षय बोरकर,रिंकु झरकर,राजु किरमे रामचंद्र मोहुर्ले यांचेसह शिवसैनिक उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडर घ्यायचा की मुलांच्या शाळेची फी भरायची?

उद्रेक न्युज वृत्त :-सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी गॅस वापरणे बंद करून पुन्हा एकदा पारंपरिक चुलीकडे वळण्यास सुरुवात केली आहे.सिलेंडर घ्यायचा की...

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-१७ जागांचा निकाल जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील १७ विधान परिषदेच्या जागांपैकी ६ जागांवर महायुतीने आधीच बिनविरोध विजय मिळवला.अश्यातच आज,सोमवार २२ जून रोजी ११ स्थानिक स्वराज्य संस्था...

राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मोहिम.. – गडचिरोलीत वृक्ष लागवडयोग्य जमिनीची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी मोहिम हाती घेतली आहे.या मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात व्यापक वृक्षारोपणासाठी उपलब्ध शासकीय जमिनींची प्रत्यक्ष...

देसाईगंज पोलिसांची धडक कारवाई; दारु तस्कराच्या आवळल्या मुसक्या.. – सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यातील दारु विक्रिवर प्रतिबंध लावण्यासाठी देसाईगंज पोलिसांनी धडक मोहिम हाती घेतली असुन एका दारु तस्कराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!