Wednesday, September 2, 2026
Homeनागपूर१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला देहव्यापारात ढकलले; तरुणास अटक..!

१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला देहव्यापारात ढकलले; तरुणास अटक..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला राजस्थान येथून आणून नागपूरच्या गंगा जमुना येथील देहव्यापारात ढकलल्या प्रकरणी २१ वर्षीय तरुणास लकडगंज पोलिसांनी अटक करून पीडित मुलीला महिला सुधारगृहात दाखल केले आहे.शुभम उर्फ पोरीया मनोरिया जंजावत वय २१ वर्षे,रा.शंकरपुरा, डवलाना, जि.बुंदी,राजस्थान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी शुभमने पीडित अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार दोघेही घरून पळाले.अश्यातच आरोपी शुभम हा मुलीला घेऊन राजस्थानहून नागपूरला आला. नागपुरात आल्यानंतर मुलीला देहव्यापारास भाग पाडू लागला.त्यासाठी त्याने गंगा जमुना वस्तीतील दोन ओळखीच्या महिलांच्या मदत घेतली.मुलीने देहव्यापारास नकार दिला असता त्याने मुलीचा विनयभंग करून देहव्यापारात ढकलले.सद्या स्थितीत उपराजधानीत ‘ऑपरेशन शक्ती’ राबविण्यात येत आहे.ऑपरेशन शक्ती अंतर्गत मानवी तस्करी, हरविलेल्या व्यक्तींचा शोध, तंत्रज्ञानाचा वापर आणि गुन्हेगारांवर चाप बसविणे असून ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत लकडगंज पोलिसांना एका अल्पवयीन मुलीकडून गंगा जमुना वस्तीत जबरदस्तीने देहव्यवसाय करवून घेण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी गंगा जमुना पोलिस चौकीजवळील सुलभ शौचालयाजवळ आरोपी शुभमला ताब्यात घेतले.आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने गंगा जमुना वस्तीतील दोन ओळखीच्या महिलांच्या मदतीने अल्पवयीन मुलीला देहव्यापारात लावल्याची कबुली दिली.पीडित मुलीच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी  आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे,तर पीडित मुलीला महिला सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!