Wednesday, July 29, 2026
Homeगोंदियास्कूल बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक..-धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार तर महिला गंभीर...

स्कूल बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक..-धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार तर महिला गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-स्कूल बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.तर दुचाकीवर मागे बसलेली त्याची पत्नी गंभीर जखमी झाली.ही घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरोली-महागाव परिसरात आज गुरुवार दिनांक-१८ जुलै ला सकाळच्या सुमारास घडली.हरी कोहरे वय ४५ वर्षे,रा.महागाव ता.अर्जुनी मोरगाव असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

हरी कोहरे हे विद्युत वितरण पारेषण अर्जुनी मोरगाव येथे शासकीय सेवेत कार्यरत होते.ते आपली रात्रपाळीतील सेवा पूर्ण करून शेतीची कामे असल्याने आपल्या पत्नीसह अर्जुनी मोरगाव वरून महागावकडे दुचाकीने जात होते.दरम्यान,सिरोली येथील राधिका पेट्रोल पंपाजवळ स्कूल बस क्रमांक – एम.एच.३५ एजे ३६३४ च्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.त्यानंतर स्कूल बसने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.ज्यामध्ये हरी कोहरे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी हिराबाई या गंभीर जखमी झाल्या.यावेळी काही प्रत्यक्षदर्शीनी घटनेची माहिती अर्जुनी-मोरगाव पोलिसांना दिली व जखमी हिराबाई यांना उपचारासाठी अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला पुढील तपास पोलीस करीत आहेत.मृतकाच्या पत्नी यांच्यावर उपचार सुरू असून त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!