- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा(गडचिरोली):-कोंढाळा जंगल परिसराच्या कक्ष क्रमांक-८०९ मध्ये वाघाने गायीच्या गोरीला ठार केल्याची घटना आज,शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा – रवी मार्गावरील बारसागडी तलाव परिसरात उघडकीस आल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत.
कोंढाळा गावातील शेतकऱ्यांच्या शेत्या रवी मार्गावरील अगदी बारसागडी तलाव परिसराला लागूनच असल्याने गुराखी गुरे चारण्यासाठी याच परिसरात नेत असतात. जंगलात वाघाचे वास्तव्य असल्याने गुराखी तसेच नागरिक जंगलात जाण्याचे टाळत आहेत.अश्यातच काल गुरुवारी गावातील गुराखी शेतशिवाराला लागून असलेल्या बारसागडी तलाव परिसरात गुरे चराईसाठी गेले होते.सायंकाळी गुरांचा कळप गावात परतला.मात्र, कोंढाळा गावातील शेतकरी विठ्ठल सोमा पेटकुले वय ४५ वर्षे यांच्या मालकीच्या गायीची गोरी कळपातून घरी परतली नाही.त्यामुळे त्यांनी परिसरात शोधाशोध केली. परिसरात शोधाशोध करूनही सापडली नसल्याने शेवटी त्यांनी गावातील महिला वनरक्षक नीलिमा सेलोटे यांना याबाबत माहिती दिली.वनरक्षक सेलोटे यांनी तात्काळ गावातील सहकारी अरुण दुपारे,गुरुदेव ठाकरे व जयानंद बुल्ले यांना सोबत घेऊन बारसागडी तलाव जंगल परिसरात शोधाशोध केली असता आज सकाळच्या सुमारास कोंढाळा-रवी मार्गावरील कक्ष क्रमांक-८०९ मध्ये वाघाने गायीच्या गोरीला ठार केल्याचे आढळून आले.माहितीनुसार,वाघाने रात्रीपासून गोरीचे संपूर्ण शरीर खाऊन काही अंश ठेवले होते.घटनास्थळी वाघाचे पगमार्कही आढळून आले.घटनेबाबत वनरक्षक सेलोटे यांनी वनक्षेत्र सहाय्यक संदीप शेंडे यांना माहिती दिली व पंचनामा करून पुढील प्रक्रिया पार पाडण्यात आली. प्रसंगी वन विभागाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यास लवकरात-लवकर भरपाई देण्यात येणार असल्याचे शेंडे यांनी सांगितले.
- संदीप शेंडे,वनक्षेत्र सहाय्यक देसाईगंज👇
कोंढाळा,ऊसेगाव,शिवराजपुर व इतर जंगल परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याने नागरिकांनी जंगल परिसरात जाण्याचे टाळावे.वन्य प्राण्यांच्या हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी जंगल परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून गावातील वनरक्षक यांचेकडून दररोज त्यांची तपासणी करण्यात येते.एखादा अनुचित प्रकार घडू नये,याकरीता नागरिकांना वेळोवेळी सतर्क राहण्याच्या सूचना वन विभागाच्या वतीने देण्यात येत आहेत.नागरिकांनी त्यांचे पालन करणे करावे.
- Advertisement -

