- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घालून सर्वसामान्य नागरिकांची घरे,जनावरे,जीवनावश्यक वस्तू तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करून शेतकऱ्यांपुढे मोठे संकट ओढवले आहे.आधीच पावसामुळे होत्याचे नव्हते झाल्याने दिवाळीसारखा मोठा सण कसा साजरा करायचा? या विवंचनेत असतांनाच सरकारने सर्वसामान्यांना शॉक देत एसटीची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला होता.शिवनेरी व शिवाई या दोन बसेस सोडता इतर सर्व एसटी बसेससाठी १५ ऑक्टोंबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत १० टक्के दरवाढ लागू करण्यात आली होती.दरवाढ झाल्यामुळे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले होते.त्यामुळे सदरची दरवाढ मागे घेतली जावी, अशी मागणी केली जात होती.या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज,बुधवार १ ऑक्टोंबरला एसटीच्या तिकीटाची केलेली हंगामी दरवाढ रद्द करण्याची घोषणा केली आहे.दरम्यान,जानेवारी २०२५ मध्ये एसटी महामंडळाने १४.९५ टक्के दरवाढ लागू केली होती.हे दर एसटीच्या सर्व सेवांसाठी लागू करण्यात आले होते.अश्यातच ऐन सणासुदीच्या काळात वातानुकूलित बसेस सोडून इतर बसेसवर दरवाढ करण्याचा निर्णय चुकीचा असल्याने सर्वच स्तरावरून टीकेची तोफ डागण्यात आली होती.त्यानुसार आता सदरची दरवाढ ही मागे घेण्यात आली असून यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- Advertisement -

