Monday, July 13, 2026
Homeभंडाराशेतकऱ्याचा शेतातच दुर्दैवी मृत्यू..!

शेतकऱ्याचा शेतातच दुर्दैवी मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-शेतात बैलजोडीने चिखलणी करीत असतांना लाकडी फणीमध्ये पाय अडकल्याने बैलजोडीने शेतकऱ्यास चिखलातून फरफटत नेल्याने एका ४५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज, शुक्रवार १३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास लाखांदूर तालुक्याच्या मांदेड गाव नजीकच्या शेत शिवारात घडली.मधुकर नामदेव राऊत वय ४५ वर्षे,रा.मांदेड, ता.लाखांदूर,जि.भंडारा असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
आज सकाळच्या सुमारास मधुकर राऊत हे शेतात उन्हाळी धानाच्या रोवणीसाठी बैलजोडीने चिखलणी करीत होते.लाकडी फळीवर उभे राहून बैलजोडीच्या सहाय्याने चिखलणी करीत असतांनाच दुपारच्या सुमारास त्यांचा एक पाय लाकडी फणीमध्ये अडकला. पाय अडकताच बैलजोडी न थांबता जोरजोराने पुढे जाऊ लागली.यात शेतकरी मधुकर राऊत चिखलात कोसळून फरफटत गेल्याने हातापायांना तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान,त्यांचे भाऊ मनोहर राऊत शेतावर गेले असता सदरची बाब निदर्शनास येताच ग्रामस्थांशी संपर्क साधून त्यांना तात्काळ लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी अंती मधुकर राऊत यांना मृत घोषित केले.घटनेने परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!