- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालविण्यात येणाऱ्या लाहेरी येथील शासकीय आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या तब्बल ७० विद्यार्थ्यांना बुधवार २८ जानेवारी २०२६ रोजी अचानकपणे उलटी,मळमळ व तीव्र पोटदुखीचा त्रास सुरु झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.सदरचा प्रकार उघडकीस येताच लाहेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० विद्यार्थ्यांवर,तर भामरागड तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयात ४० विद्यार्थ्यांवर उपचार सुरु करण्यात आले.यातील ११ विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तात्काळ पुढील उपचारार्थ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात व काही विद्यार्थ्यांना नागपूरला हलविण्यात आले होते.घटनेची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी अमर राऊत,तहसीलदार किशोर बागडे,सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोशन चव्हाण यांच्यासह अधिकाऱ्यांनी तातडीने रुग्णालय व आश्रम शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत आरोग्य विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या.अश्यातच आता विषबाधा प्रकरणी प्रकल्प अधिकारी अमर राऊत यांनी कारवाईचा बडगा उगारून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक डी.जी.रापंजी आणि अधीक्षक एम.एम.पाटील यांचे तडकाफडकी निलंबित करण्यात आले.तर पाच कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याचा आदेश दिला आहे.यात महिला अधीक्षिका पी.एस.मडावी,चतुर्थ श्रेणी कर्मचारी जी.एस.बोम्मावार, एस.एम.पवार,एस.एस.नैताम,सी.बी.कुळसंगे,डी.एफ.कोकोडे यांची एक वर्षासाठी वेतनवाढ रोखण्यात आली आहे.कारवाईने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
- Advertisement -

