Tuesday, September 1, 2026
Homeगोंदियापोलिसांचा ज्याच्यावर संशय; तोच निघाला २८ वर्षीय महिलेचा मारेकरी.. - दोन दिवसांपूर्वी...

पोलिसांचा ज्याच्यावर संशय; तोच निघाला २८ वर्षीय महिलेचा मारेकरी.. – दोन दिवसांपूर्वी जंगलात आढळला होता मृतदेह..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-बेपत्ता झालेल्या एका २८ वर्षीय महिलेचा मृतदेह दोन दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवार ३ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या मार्गावरील तिरोडा तालुक्याच्या बोंडराणी जंगलातील पाणंद रस्त्यालगत पळसाच्या झाडाखाली संशयास्पद स्थितीत आढळून आला होता.प्राथमिक तपासात महिलेच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकल्याचे व शरीरावर जखमा असल्याचे आढळून आल्याने महिलेचा खून करून मृतदेह जंगलात फेकून दिल्याचे मृतदेहाच्या पाहणीवरून स्पष्ट झालेले असतांनाच काहानिमध्ये ट्विस्ट आला आहे.महिला ज्या व्यक्तीसोबत गेली त्यानेच तिचा घात केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने दवनीवाडा व खैरलांजी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.पूनम राकेश तुमाने वय २८ वर्षे रा.खैरी, जि.बालाघाट,मध्यप्रदेश असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे,तर गावातीलच संजय तितरमारे वय ४१ वर्षे, रा.खैरी,जि.बालाघाट असे आरोपीचे नाव आहे.
पूनम तुमाने ही महिला २८ जानेवारी २०२६ रोजी गावातीलच संजय तितमारे याच्यासोबत वाराशिवनी न्यायालयात पेशी असल्याचे सांगून घरून निघाली होती.यानंतर पूनम व संजय हे दोघेही २८ जानेवारीला गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील परसवाडा टी पॉइंटवर गेले.तिथून पूनमने आपल्या आईला घरी येणार आहे; एवढे सांगून फोन कट केला.मात्र,रात्री उशिरापर्यंत पूनम घरी परतली नाही.संजयने पूनमच्या घरी जाऊन तुमची मुलगी माझ्यासोबत परत आली नाही.ती घरी आली कां?अशी विचारणा पूनमच्या वडिलांना केली. यानंतर ते वाराशिवनी व रामपायलीकडे पूनमचा शोध घेण्यासाठी निघाले. पण,तिचा शोध न लागल्याने बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी पोलिस स्टेशन येथे ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.यानंतर पोलिसांनी पूनमचा शोध घेण्यास सुरुवात केली. अश्यातच ३ फेब्रुवारीच्या मंगळवारी दुपारच्या सुमारास बोंडराणी जंगलाकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यालगत पळसाच्या झाडाखाली एका महिलेचा मृतदेह चंद्रकुमार भगत या शेतकऱ्याला दिसून आला असता याची माहिती गावकरी व दवनीवाडा पोलिसांना दिली.घटनेची माहिती मिळताच दवनीवाडा पोलिस व उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर,पोलिस निरीक्षक वैशाली ढाले,सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय टेकाम घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचा पंचनामा करून याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.याप्रकरणात पोलिसांना सुरुवातीपासूनच संजय तितरमारे याच्यावर संशय होता आणि तो खरा ठरला.सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.मात्र,खाकीच्या धाकापायी तो नरमला आणि गुन्हा कबूल केला.याप्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी आरोपी संजय तितरमारे विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१)अन्वये गुन्हा दाखल करून त्याला काल बुधवारी दवनीवाडा पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.हत्या प्रकरणाचा पुढील तपास दवनीवाडा पोलिस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!