Monday, April 27, 2026
Homeगोंदियावेळीच सावध रहा..! अश्लील फोटोवर विवाहित महिलेचा चेहरा लावुन इन्स्टाग्रामवर केली बदनामी...

वेळीच सावध रहा..! अश्लील फोटोवर विवाहित महिलेचा चेहरा लावुन इन्स्टाग्रामवर केली बदनामी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-हल्ली सोशल मीडियाचा वापर इतका भनायक वाढलाय की,त्याची कलपणाच न केलेली बरी.सोशल मीडियाचे बरेचसे फायदे असले तरीही तितकेच काहींच्या करण्यांमुळे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत.सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादा व्यक्ती रातोरात प्रसिद्धीच्या झोतात येतो,तर काहींच्या खराब मानसिकतेमुळे एखाद्यास मानसिक त्रास व बदनामीला सामोरे जावे लागत आहे.एखादेवेळी वा नेहमीची दिनचर्या म्हणून आपण सोशल मीडियाच्या विविध लोकपसंतीच्या ॲपवर फोटो अपलोड करीत असतो.फोटो अपलोड केल्यानंतर लाइक्स,कॉमेंट व नाना तऱ्हेचे मॅसेजमुळे आपण आनंदित होतो व अश्या अपलोड केलेल्या फोटो सोशल मीडियावर वर्षानुवर्षे फिरत असतात.याच फोटोचा आधार घेऊन  काहीजण मानसिक त्रास व जाणून बुजून बदनामी करण्याच्या प्रयत्नात असतात.त्यामुळे वेळीच सावध पवित्रा घेणे गरजेचे झाले आहे.अश्याच प्रकारे एका क्लिष्ट मानसिकतेच्या २५ वर्षीय तरुणाने आपल्याच गावातील ३२ वर्षीय विवाहित महिलेचा अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनाम करण्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील लाखेगाव येथे उघडकीस आला आहे.प्रकरणी महिलेने तिरोडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तिरोडा तालुक्याच्या लाखेगाव येथील ३२ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार,गेल्या सहा महिन्यांपासून त्या इन्स्टाग्राम वापरत होत्या.२४ मे २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता,मोबाइलवर इन्स्टाग्रामवर रिल्स पाहत असतांना अक्षय श्रीनिवास नावाच्या अकाऊंटवर त्यांचा चेहरा असलेला आणि दुसऱ्या महिलेचे अर्धवट उघडे शरीर असलेला अश्लील फोटो आढळला.त्यानंतर त्यांनी तिरोडा पोलिस ठाण्यात अर्ज करून गोपनीय चौकशीची विनंती केली होती.पोलिसांनी खात्रीशीर तपास करून संबंधित अकाऊंट तपासले असता,सदरचा फोटो अतुल रमेश डोहळे वय २५ वर्षे,रा.लाखेगाव,ता. तिरोडा याने तयार करून व्हायरल केल्याचे निष्पन्न झाले.फोटो प्रसारित केल्यामुळे महिलेला मानसिक त्रास व बदनामी झाली.आरोपीची ओळख पटल्यावर त्यांनी पतीसह पोलिस स्टेशन गाठून याची तक्रार नोंदवली.तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत व बदनामीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास तिरोडा पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारखान्यात आढळून आले बालकामगार; संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी कंपनी असो वा कुठलेही दुकान, हॉटेल,ढाबे,चहाची दुकाने वा इतर आस्थापनांमध्ये बालकांना कामावर ठेवणे गंभीर गुन्हा आहे.यात १४ वर्षे वयाखालील मुलांचा...

आता लग्न पत्रिकेवर टाकावी लागणार जन्मतारीख..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अजूनही विशेषतः ग्रामीण आणि काही दुर्गम भागात छुप्या पद्धतीने बालविवाह लावले जातात.अनेकदा मुलगी अल्पवयीन असतांनाही तिचे लग्न लावून...

उन्हाचा तडाखा; फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरण व ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीच्या वेळेत तात्पुरता बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढलेल्या उष्माघाताच्या घटनांचा विचार करता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण(फिटनेस सर्टिफिकेट रेनेवल)तसेच पक्की अनुज्ञप्ती(ड्रायव्हिंग लायसन्स)चाचणीच्या...

३० वर्षीय महिलेची दिराने धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात आज,सोमवार २७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास एक भयावह आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली.नात्यातील दिरासोबत विवाह समारंभासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!