Sunday, May 31, 2026
Homeनागपूरविदर्भात नागपूर गारठला; १५ अंशावर पारा.. - विधानसभेच्या मतदानानंतर सर्वत्र थंडीचा कडाका...

विदर्भात नागपूर गारठला; १५ अंशावर पारा.. – विधानसभेच्या मतदानानंतर सर्वत्र थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-रात्रीच्या तापमानात सातत्याने
होत असलेली घसरण काल,गुरुवारीही कायम होती. बुधवारी १६ अंशांवर असलेले नागपूर शहराचे किमान तापमान काल,गुरुवारी पुन्हा १ अंशाने घसरत १५ अंशांवर पोहोचले,जे विदर्भात सर्वांत कमी होते.पारा घसरल्याने रात्रीच्या वेळी गारठ्याची जाणीव अधिक तीव्रपणे नागपूरकरांना होऊ लागली आहे.
गेल्या काही दिवसांत उत्तर भारतातील वातावरण बदलायला लागले आहे.दिल्ली,पंजाब,राजस्थान, उत्तर प्रदेश,छत्तीसगडच्या काही भागांपर्यंत धुक्याची चादर पसरत आहे.त्या प्रभावाने मध्य भारतातही वातावरणात गारवा तयार झाला आहे.विदर्भात सायंकाळपासून ही परिस्थिती बघायला मिळते.नागपूरशिवाय भंडारा १५.१ अंश,गडचिरोली १५.४, यवतमाळ १५.५ व चंद्रपूरला किमान तापमान १५.६ अंशांवर आले आहे. वर्धा,अमरावती १६ अंशांवर, तर अकोला १८ अंशांवर आहे.दिवसाचा पारा अद्यापही सरासरीच्या आसपास आहे. अकोला व अमरावतीत दिवस अद्यापही तापत आहे. येथे कमाल तापमान १.२ व २.५ अंशांनी अधिक आहे.विदर्भात आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे काही दिवस कमाल व किमान तापमान स्थिर राहणार आहे.विधानसभेच्या मतदानानंतर थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!