Sunday, August 30, 2026
Homeनागपूरविदर्भातील नेता हरपला; माजी खासदार दत्ता मेघे यांचे निधन..

विदर्भातील नेता हरपला; माजी खासदार दत्ता मेघे यांचे निधन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेले व राजकारण,शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भरीव काम करणारे विदर्भातील ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे आज,रविवार २२ मार्च रोजी वयाच्या ९० व्या वर्षी नागपूर येथे निधन झाले.त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला.त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच नागपूरच्या खामला पांडे लेआऊट येथील निवासस्थानी सर्वपक्षीय नेते,पदाधिकारी,चाहत्यांनी गर्दी केली.
दत्ता मेघे यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३६ रोजी वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे झाला.गरीब परिस्थितीतून पुढे आलेले दत्ता मेघे यांनी विदर्भातील राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले.त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात काँग्रेसमध्ये केली.त्यांनी वर्धा, रामटेक,नागपूर लोकसभा मतदार संघातून चार वेळा प्रतिनिधित्व केले.राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम केले.ते तीन वेळा विधान परिषद सदस्य,मंत्रीही होते.२०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. १९७८ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील पुलोद सरकारमध्ये ते विदर्भातून मंत्री होते.१९९१ मध्ये त्यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजय संपादन केला.यानंतर रामटेक,व वर्धा या मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले.विदर्भातील तीन मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येणारे ते विदर्भातील एकमेव नेते आहेत.वर्धा येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून त्यांनी विदर्भात अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या आहेत.त्यांच्या जाण्याने सामाजिक,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.दत्ता मेघे यांच्या पश्चात सागर मेघे व आमदार समीर मेघे ही दोन मुले,सुना,नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वेगात असलेल्या कारने एकाला चिरडले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भरधाव वेगात असलेल्या एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याची घटना आज,रविवार ३० ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास नागपूर शहरातील जपानी गार्डन...

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!