Wednesday, April 15, 2026
Homeदेसाईगंजवादळ,वारा आणि मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान; शेतकरी बांधव चिंताग्रस्त.. - काँग्रेस नेते...

वादळ,वारा आणि मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान; शेतकरी बांधव चिंताग्रस्त.. – काँग्रेस नेते रामदास मसराम यांनी शेतपिकांची केली पाहणी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात काल,९ सप्टेंबर रोजी वादळ,वारा आणि मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले होते.काही भागात मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अती मुसळधार पाऊस पडल्याने देसाईगंज तालुक्याच्या चिखली रिठ, चिखली तूकुम,कीन्हाळा-मोहटोला येथील शेतकरी बांधवांचे उभे असलेले धानपीक भुईसपाट झाल्यानेशेतकऱ्यांच्या डोळ्यांतून दुःखाश्रू वाहू लागले आहेत.अशातच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे रामदास मसराम यांनी आज, मंगळवार दिनांक-१० सप्टेंबरला सकाळच्या सुमारास परिसरातील शेतकऱ्यांच्या शेत बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करीत शेतकरी बांधवांना धीर देत देसाईगंज तहसीलदार यांना संपर्क साधत तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
कित्तेक दिवसांपासून शेतकरी बांधव शेतीसाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते.बऱ्याच प्रतीक्षेनंतर काल,९ सप्टेंबर पासून पावसाचे आगमन झाले.पावसाने हजेरी तर लावली; मात्र,देसाईगंज तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान करून तोंडातील घास हिरावून घेतला आहे.तालुक्यातील चिखली रिठ,चिखली तूकुम,कीन्हाळा-मोहटोला येथील शेतकऱ्यांचे उभे धानपीक अक्षरशः झोपलेल्या अवस्थेत गेल्याने काय करावे? असा प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनात घर करून सोडत आहे.शेतकरी बांधवांनी सर्व जमापुंजी शेतीसाठी खर्चिक घातली; अशातच धानपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त होऊन आर्थिक संकटात सापडला आहे.काँग्रेस नेते रामदास मसराम यांनी शेतकरी बांधवांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ दखल घेण्याची मागणी तहसीलदार यांना केली.त्यानुसार देसाईगंजच्या तहसीलदार प्रीती डूडूलकर यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत स्थानिक तलाठी तसेच कर्मचारी वर्गांना कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!