Tuesday, July 14, 2026
Homeगोंदियालग्नाचा आग्रह करताच नकार देणाऱ्या तरुणावर बलात्कार तथा फसवणुकीचा गुन्हा दाखल..!

लग्नाचा आग्रह करताच नकार देणाऱ्या तरुणावर बलात्कार तथा फसवणुकीचा गुन्हा दाखल..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-एका ३० वर्षीय तरुणाने ४२ वर्षीय महिलेला जाळ्यात ओढून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तत्पूर्वी तरुणाने आपण लग्न करून एकत्र राहण्याच्या भूलथापा दिल्या.तब्बल चार वर्षे दोघांमध्ये आकर्षण वाढत गेले.या दरम्यान महिलेने तरुणाकडे अनेकदा लग्नाचा आग्रह केला,परंतु त्याने टाळाटाळ करून फसवणूक केली.अखेर महिलेने गोंदिया शहर पोलिस ठाणे गाठून तरुणाविरोधात तक्रार नोंदवली.प्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी नागपूर येथील तरुणावर बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित ४२ वर्षीय महिला ही गोंदिया शहराच्या श्रीनगर परिसरात वास्तव्यास आहे.काही वर्षांपूर्वी महिलेची ओळख नागपुरातील भारत नगर,गोकुळ डेअरीजवळ, कलमना मार्केट येथील ३० वर्षीय संशयित आरोपी बादल रतन दुर्गे याच्याशी झाली होती.ओळखीचे रूपांतर जवळीकता वाढीत झाले.त्यानंतर आरोपी तरुणाने १३ एप्रिल २०२१ पासून ते १० सप्टेंबर २०२५ या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवून महिलेशी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्न करणार म्हणून महिलेने तरुणाशी बोलणे सुरू ठेवले.अश्यातच आरोपी तरुणास लग्नाबाबत विचारले असता,त्याने नकार दिला. सुरुवातीला लग्नाचे आमिष दाखवून आता नकार दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात येताच तिने गोंदिया शहर पोलिस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली.प्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास गोंदिया शहर पोलिस प्रशासन करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!