Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीशेतकऱ्याची फसवणूक; १४५ दिवसांचे भातपीक निसावले ८० दिवसांत.. - लोंब गळून पडू...

शेतकऱ्याची फसवणूक; १४५ दिवसांचे भातपीक निसावले ८० दिवसांत.. – लोंब गळून पडू लागल्याने तक्रार; कृषी विभाग शेतबांधावर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-लागवड केलेल्या भातपीकाचा कालावधी होण्यापूर्वीच पीक हाती आले खरी; पण निसावलेले धानाचे लोंब गळून पडणे,निसावतांनाच धानाचा फोल होणे व इतर बाबी शेतकऱ्यांना दिसून आल्याने आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच संबंधित शेतकऱ्यास कृषी विभागाकडे धाव घ्यावी लागले असल्याचा प्रकार गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आला आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या गडचिरोली तालुक्यातील माडेतुकुम येथे यशोदा सिड्स कंपनीने शेतकऱ्याची  फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.माडेतुकुम येथील रामचंद्र ढोंगे या शेतकऱ्याने ४ जून २०२५ रोजी प्रशांत कृषी केंद्र खरपुंडी,ता.गडचिरोली येथील कृषी केंद्रातून खरीप हंगामासाठी NOVA-145 या जातीचे यशोदा सिड्स कंपनीचे १० किलो ग्रॅमची एक बॅग याप्रमाणे ११ बॅग पीक लागवडीसाठी भात पिकाचे वाण खरेदी करून ७ एकरात भातपीकाची लागवड केली होती.या पिकाचे उत्पादन १४५ दिवसात येण्याचे कंपनीकडून तसेच सदरचे भात पिकाची लागवड केल्यानंतर १४५ दिवसात त्याचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार असल्याची बतावणी कृषी केंद्र संचालक आणि कंपनीकडून सांगितल्या गेले होते.मात्र,सदरचे धानपीक ८० ते ८५ दिवसांतच निसावले.धानपीक निसावले खरी; पण धानाचे लोंब गळून पडणे व निसावतांनाच धानाचा फोल होऊ लागल्याने शेतकऱ्याला मोठा धक्का बसला. तब्बल ७ एकरातील धानपीक नष्ट होऊ लागल्याने आपली फसगत झाल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात येताच रामचंद्र ढोंगे यांनी सदरच्या प्रकाराबाबतची तक्रार गडचिरोली कृषी विभागाकडे केली.कृषी तज्ञांच्या टीमने पिकाची पाहणी केली असता १४५ दिवसांच्या कालावधीचे धानपीक ८० ते ८५  दिवसांत निसावले असल्याचे दिसून आले.त्यातच ९० टक्के धानपिकांत भेसळ तसेच धान परिपक्व झाल्याचे आढळून आले आहे.त्यातच धान गळून पडणे,फोल होणे इत्यादी बाबी आढळून आल्या आहेत.प्रकरणी कृषी विभागाच्या वतीने पंचनामा करण्यात आला.सदर पंचनामा करतांना गडचिरोली उपविभागीय कृषि अधिकारी मधुगंधा जुलमे,तालुका कृषि अधिकारी सुप्रिया करंबळकर, भाताचे विशेषतज्ञ प्राचार्य डॉ.भुपेश नंदनवार,यशोदा कंपनीचे प्रतिनीधी विक्रांत पाटील,पंचायत समितीचे कृषि अधिकारी वाय.पदा,गुण नियंत्रण कृषि अधिकारी अभिलाशी येरमे,रामकृष्ण भुरले,पंकज गेडाम,रामचंद्र ढोंगे आदी शेतकरी उपस्थित होते.संबंधित कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यास आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी; अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!