Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीराज्यस्तरीय "महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा २०२६" साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन.. - रोख रक्कम,आकर्षक...

राज्यस्तरीय “महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा २०२६” साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन.. – रोख रक्कम,आकर्षक सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नाट्यश्री साहित्य कला मंच,गडचिरोली या संस्थेतर्फे राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा-२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.नाट्यश्रीतर्फे साहित्यिकांच्या साहित्यकृतींना प्रेरणा मिळावी,या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आलेला असून गेल्या दोन वर्षात अनुक्रमे ३६ व ३३ साहित्यिकांना तसेच १९ साहित्यिकांना उत्तेजनार्थ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
या “राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार-२०२६” साठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील साहित्य स्विकारले जातील.तरी १)कादंबरी, २)कथासंग्रह,३) कवितासंग्रह/गझलसंग्रह,४) समीक्षा किंवा संपादन,५) नाटक/एकांकिका किंवा नाट्यविषयक ग्रंथ, ६)आत्मकथन किंवा चरित्रग्रंथ,७) ललीत/वैचारिक लेखसंग्रह/ प्रवासवर्णन व ८)बाल/कुमार साहित्य व ९) संकिर्ण म्हणजेच वरील सर्व प्रकारात न मोडणारे कोणतेही साहित्य प्रकार,या वाङ्मय प्रकारातील प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. रोख रक्कम,आकर्षक सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून इच्छुक साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीच्या दोन प्रती व अल्पपरिचय,केवळ पोस्टानेच चुडाराम बल्हारपुरे(नाटककार),महामृत्युंजय निवास,वार्ड क्रं.१७,राधे बिल्डिंगच्या मागे,चामोर्शी रोड,गडचिरोली पिन-४४२६०५(महाराष्ट्र राज्य),भ्रमणध्वनी क्र.९६२३६६३४३५, या पत्त्यावर ३० जून २०२६ पर्यंत पाठवावे,असे आवाहन संस्थेचे संचालक/संस्थापक चुडाराम बल्हारपुरे यांनी निवेदनाद्वारे केलेआहे.(पुरस्कारप्राप्त साहित्यिक यांना पोस्टाने पुरस्कार पाठविल्या जाणार नाही.पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागेल.त्यासाठी संमेलनशुल्क, सहभाग शुल्क किंवा इतर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.) (पुस्तके मिळताच व्हाट्सअप वर वैयक्तिकरित्या पोच दिल्या जाईल व यथावकाश निकालही कळविला जाईल.)
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!