- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने मार्कंडा येथे ‘झाडीपट्टी नाट्य महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे.उद्या,सोमवार १६ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ६.३० वाजता मुख्य प्रवेशद्वाराजवळ, मार्कंडा,ता.चामोर्शी,जि.गडचिरोली येथे हा महोत्सव पार पडणार असून रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच उद्या,सोमवार १६ फेब्रुवारी रोजी ‘रक्षक’ हे नाटक सादर होणार आहे. लेखक व दिग्दर्शक परमात्मा गाहणे असून कलादर्पण नाट्य रंगभूमी,वडसा यांच्याकडून सादरीकरण होणार आहे.
मंगळवार,१७ फेब्रुवारी रोजी ‘अवतार’ हे नाटक रंगभूमीवर येणार आहे.निर्माते संदीप राऊत,दिग्दर्शक शेरू खान व सोमणाथ नागवंशी,लेखक महेश मैंद यांचे हे नाटक असून सादरीकरण संपदा थिएटर्स,वडसा, यांच्याकडून करण्यात येणार आहे.
बुधवार,१८ फेब्रुवारी रोजी ‘बापाचं काळीज’ हे नाटक सादर होणार आहे.निर्माते ज्ञानेश्वर ठेंगरी,दिग्दर्शक अशोक दुधकुवर व विलास वट्टी,लेखक बाळकृष्ण ठाकूर यांची ही कलाकृती असून ज्ञानेश्वर नाट्य रंगभूमी,वडसा यांच्याकडून सादरीकरण होणार आहे.
झाडीपट्टी नाट्य परंपरेला राज्यस्तरीय व्यासपीठ देत स्थानिक कलावंतांच्या कलागुणांना वाव देणारा हा महोत्सव गडचिरोली जिल्ह्यातील नाट्यरसिकांसाठी सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे.जिल्ह्यातील सर्व नागरिक,नाट्यप्रेमी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा लाभ घ्यावा,असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.
- Advertisement -

