Monday, August 31, 2026
Homeनागपूरआर्थिक फायद्यासाठी रूम उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल मालकासह महिला रिसेप्शनिस्टवर गुन्हा दाखल.....

आर्थिक फायद्यासाठी रूम उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल मालकासह महिला रिसेप्शनिस्टवर गुन्हा दाखल.. -अल्पवयीन मुलगी गर्भवती प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवर बहरून आलेल्या प्रेमाचा अखेर पोलीस ठाण्यात शेवट झाला. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची वर्षभरापूर्वी अनिकेत डहाके वय २४ वर्षे,रा.आंतरगाव,ता.समुद्रपूर,जि.वर्धा याच्या सोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली.चॅटिंगमुळे दोघेही एकमेकांच्या जवळ आले.त्याने तिला विश्वासात घेत भिवापूर शहरात बोलावले आणि शहरातील अर्णव गोल्ड ओयो हॉटेलमध्ये तिच्याशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले.यात पीडिता गर्भवती राहिल्याने प्रकरण पोलिसांत पोहचले. प्रकरणी भिवापूर पोलिसांनी विविध कलमान्वये आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.प्रकरणाचा तपास भिवापूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असतांनाच तपासाला एक धक्कादायक वळण मिळाले.आरोपी तरुणाने पीडितेला ८ सप्टेंबर,१९ सप्टेंबर आणि ६ नोव्हेंबर २०२५ अशा विविध तारखांना अर्णव गोल्ड ओयो हॉटेलमध्ये नेल्यानंतर व्यवस्थापनाने कायदेशीर प्रक्रियेला बगल दिली व नियमबाह्यरीत्या रूम उपलब्ध करून देण्यात आली.विशेष म्हणजे,अल्पवयीन पीडितेच्या ओळखपत्राची कोणतीही खातरजमा न करता वारंवार रूम उपलब्ध करून दिल्याने व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा २०१२ च्या कलम १७ अन्वये,गुन्ह्यात साहाय्य केल्याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकासह महिला रिसेप्शनिस्टवर गुन्हा दाखल केला आहे.भूपेंद्र बलवंत सोने रा.दिघोरी,नागपूर असे हॉटेल मालकाचे नाव आहे,तर माधुरी शेंडे वय ३६ वर्षे, रा.भिवापूर असे रिसेप्शनिस्टचे नाव असून या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!