- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-ज्याच्या नावातच आहे राज आणि कारण त्यालाच म्हणतात राजकारण.राजकारणात काही खरे नाही.कोण? कधी? काय करून बसेल आणि पलटी होईल,याचा विचारच करणे दिमाकाच्या पलीकडे आहे. महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरू असतांना निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अनिल देशमुख आपल्या मुलाच्या प्रचारासाठी गेले होते. नरखेडहून काटोलकडे परततांना बैलफाटा येथे अंधारात दबा धरून बसलेल्या चार जणांनी गाडीसमोर येत दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला होता.या घटनेत देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती त्यावेळी देण्यात आली होती.घटनेनंतर त्यांना तातडीने नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठे आंदोलन केले होते आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.ही घटना १९ नोव्हेंबर २०२४ रोजी घडली होती.मात्र,दीर्घ तपासणीनंतर पोलिसांनी या हल्ल्याबाबत कोणतेही तथ्य आढळले नाही,असे न्यायालयात स्पष्ट केले आहे. पोलिसांच्या मते,जर कोणी दगड फेकला असता तर ते गाडीच्या मधल्या किंवा मागच्या सीटवर असते.परंतु घटनेच्या वेळी दगड हे पुढच्या सीटवर होते.आता या अहवालानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. खरोखर हल्ला झाला होता की राजकीय आश्रय मिळवण्यासाठी ही कथा रचली गेली होती,असा संशय व्यक्त केला जात आहे.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या कथित हल्ल्याबाबत नागपूर ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात ‘बी फायनल’ रिपोर्ट सादर केला आहे.या अहवालानुसार घटनेबाबत कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत आणि फॉरेन्सिक तपासातही हल्ला खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.अश्यातच आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महत्त्वाचे खुलासे केले.देशमुखांनी थेट सांगितले की, “फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिले आहे की माझ्यावर दगडफेक करण्यात आली होती.लहान दगड आणि दहा किलो वजनाचा मोठा दगड गाडीवर मारण्यात आला.त्यामुळे गाडीची काच फुटून माझ्या कपाळाला गंभीर दुखापत झाली होती.या प्रकरणात सुरूवातीपासूनच राजकीय हस्तक्षेप झाला,असा गंभीर आरोप देशमुखांनी केला आहे.ही घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी कोणताही रिपोर्ट न पाहता घाईघाईत प्रतिक्रिया दिली.राजकीय दबावामुळे त्यांनी चुकीचा उल्लेख केला.देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेला हलके करून ‘सलीम-जावेदची स्टोरी’ म्हटले.पण फॉरेन्सिक रिपोर्टने सत्य स्पष्ट केले आहे,असे देशमुख म्हणाले.देशमुखांनी सांगितले की,हा फॉरेन्सिक रिपोर्ट ते लवकरच सर्वसामान्य जनतेसमोर आणतील.माझ्यावर हल्ला झालाच,हे फॉरेन्सिकने सिद्ध केले आहे.सरकारने याकडे डोळेझाक केली.आता आम्ही यावर योग्य ती कारवाई करू,असेही ते म्हणाले.त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वादळ उठण्याची चिन्हे आहेत.या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वादंग निर्माण केला आहे.पोलिसांच्या निष्कर्षानंतर हल्ल्याची सत्यता मोठ्या प्रश्नचिन्हाखाली आली असून पुढील काही दिवसांत यावर राजकीय प्रतिक्रियांचा भडिमार होण्याची शक्यता आहे.
- Advertisement -

