Saturday, May 2, 2026
Homeकोरचीमशीनमध्ये सिमेंट मिसळत असतांना यंत्रात गेला अन् जीव गमावून बसला...

मशीनमध्ये सिमेंट मिसळत असतांना यंत्रात गेला अन् जीव गमावून बसला…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोरची(गडचिरोली):- रस्त्याचे काम सुरु असतांना सिमेंट काँक्रिट मिक्सरमध्ये अडकून एका तरुणाचा मृत्यू झाला असल्याची हृदयद्रावक घटना काल,गुरुवार २८ नोव्हेंबरला कोरची तालुक्यातील कोटगुल परिसरातील बडीमाध्ये गावात घडली.कैलास ब्रिजलाल पुडो वय २५ वर्षे,रा.बडीमाध्ये,ता.कोरची असे मयताचे नाव आहे.
कोरचीपासून २० किलोमीटरवरील बडीमाध्ये गावात काल गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ११ मीटर सिमेंट रस्ता बनविण्याचे काम सुरु होते.यावेळी सिमेंट मिसळत असतांना यंत्रात कैलास पुडो याचा हात गेला; यानंतर तो आत खेचला गेला व त्याचे संपूर्ण शरीर यंत्रात गुंडाळले गेले.त्यानंतर उपस्थितांनी
कैलासला १०८ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात नेले.डॉक्टरांनी तपासणी केली असता मृत घोषित केले.कोरची पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा येथे दोन दिवसांपासून बिबट्याची दहशत; दोन शेळ्यांचा पाडला फडशा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत एकाच दिवशी दोन शेळ्यांचा फडशा पाडून दहशत माजवली आहे.बिबट्या एवढ्यावरच थांबला नाही,तर परत दुसऱ्या दिवशीही शिकारीच्या...

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!