Wednesday, September 23, 2026
Homeनागपूरअपक्ष उमेदवारास कुटुंबाचीच १८ मते असतांना मिळाली केवळ दोनच मते.. - मतमोजणी...

अपक्ष उमेदवारास कुटुंबाचीच १८ मते असतांना मिळाली केवळ दोनच मते.. – मतमोजणी पुन्हा करून न्याय देण्याची केली मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने १३२ जागा,शिंदेंच्या शिवसेनेने ५७ जागा तर अजित पवारांच्या पक्षाने ४१ जागांवर विजय मिळवित महाराष्ट्र राज्यात महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे.अशातच नागपुरातील एका अपक्ष उमेदवाराला घरच्या कुटुंबातीलही मत मिळाले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत अपक्ष उमेदवाराने पत्रपरिषद घेत याबाबत माहिती दिली आहे.
उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातील २९२ क्रमांकाच्या बूथवर माझ्या कुटुंबातील १८ मते असतांना मला केवळ दोनच मते मिळाली आहेत. त्यामुळे ईव्हीएमद्वारे झालेली मतमोजणी पुन्हा करून न्याय द्यावा; अशी मागणी उत्तर नागपूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रमेश बाबुराव फुले यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
रमेश फुले म्हणाले की,सत्तेवर येण्यासाठी भाजपने लाडकी बहीण योजना राबवून मतदारांना प्रलोभन दिले.ईव्हीएमद्वारे मतांचे ध्रुवीकरण केल्यामुळे अपक्ष उमेदवारांना शून्य ते एक मते मिळाली.त्यामुळे ईव्हीएमच्या बोगस मतमोजणीला आमचा विरोध आहे.मला २९२ क्रमांकाच्या बूथवर कुटुंबाची १८ मते असतांना केवळ २ मते मिळाली.त्यामुळे ही मतमोजणीच संशयास्पद आहे.त्यामुळे उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून करण्यात आली आहे.मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.फुले यांना उत्तर नागपूर मतदारसंघात एकूण ११६ मते मिळाली आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!