Saturday, August 29, 2026
Homeनागपूरमध्यरात्रीसह आज सकाळी पावसाची हजेरी; अनेक जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट'.. - दोन...

मध्यरात्रीसह आज सकाळी पावसाची हजेरी; अनेक जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’.. – दोन दिवस अवकाळी पाऊस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-हवामान बदलाचे काही खरे नाही.काही वर्षांपासून पावसाळ्याचा नेमका ऋतू कोणता?अशी म्हणण्याची वेळ आली आहे.पाऊस केव्हा हजेरी लावेल व नुकसान करून सोडेल,याचा काही नेम नाही.अश्याच प्रकारे रविवारच्या मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली.नागपूर शहरात रविवारी मध्यरात्री जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपून काढले.सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.मनिष नगर परिसरातील अंडरपासमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने वाहनधारकांची मोठी कोंडी झाली.
भंडाऱ्यात आज सोमवारी पहाटे ५ वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला.याचा फटका चना,तूर,मूग आणि उडीद या कडधान्यांसह फुलोऱ्यावर आलेल्या भाजीपाल्याला बसला आहे.मात्र,उन्हाळी भात पिकासाठी हा पाऊस लाभदायक असल्याचे बोलले जात आहे.त्याचबरोबर,गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी आणि सालेकसा तालुक्यात आज सोमवारी सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत.येथेही बागायतदार शेतीला फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.भारतीय हवामान खात्याने आज,सोमवार २३ फेब्रुवारी व उद्या,मंगळवार २४ फेब्रुवारी रोजी राज्याच्या विविध भागांत पावसाचा अंदाज वर्तविला असून विदर्भातील गडचिरोली व चंद्रपूर तर मराठवाड्यातील लातूर,हिंगोली,नांदेड व धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारे तब्बल १० सराईत गुन्हेगार तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर येत  नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या...

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!