Friday, May 1, 2026
Homeनागपूरपेपर सुरू होण्यापूर्वीच व्हॉट्सॲपवर प्रश्नपत्रिका; आज दोघांना बेड्या..

पेपर सुरू होण्यापूर्वीच व्हॉट्सॲपवर प्रश्नपत्रिका; आज दोघांना बेड्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सिव्हिल लाइन्स परिसरातील सेंट उर्सुला हायस्कूलमधील परीक्षा केंद्रावर बुधवार १८ फेब्रुवारी रोजी रसायनशास्त्राचा(केमेस्ट्री)पेपर होता.तेथील एक विद्यार्थिनी साधारणतः बारा वाजण्याच्या सुमारास प्रसाधनगृहात गेली.सुमारे १५ मिनिटे ती वर्गात न आल्याने केंद्रावरील पर्यवेक्षकांना संशय आला.तिची झडती घेतली असता एक स्मार्ट फोन आढळला.तो जप्त करण्यात आला.तो तपासला असता त्यामध्ये एका व्हॉटस्ॲप ग्रुपवर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच पेपर आलेला होता.तसेच त्याच ग्रुपवर प्रश्नांची उत्तरेसुद्धा आलेली होती.संबंधित विद्यार्थिनीने तिच्या मैत्रिणीचेही नाव सांगितले.दोघींचीही चौकशी केली असता त्या एकाच व्हॉटस्ॲप ग्रुपवर असल्याचे स्पष्ट झाले.विद्यार्थिनींच्या मोबाइलमध्ये १६ फेब्रुवारी रोजी झालेला भौतिकशास्त्राचाही(फिजिक्स)पेपर सापडला.हा प्रकार शिक्षण विभागालाही कळविण्यात आला. शिक्षणाधिकारी(माध्यमिक)अनिल दहीफळे यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी पेपर फोडणाऱ्यावर गुन्हा दाखल केला होता.प्रकरणी राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत अहवाल देण्याचे आदेश दिलेले असतांनाच विद्यार्थिनीची चौकशी आणि तांत्रिक तपास केल्यावर तो पेपर एका शिकवणी वर्गातून फोडण्यात आल्याची माहिती समोर आली.त्यावरून,सदर पोलिसांनी आज, रविवार २२ फेब्रुवारी पहाटेच्या सुमारास सापळा रचून दोघांना अटक केली आहे.निशिकांत मूल वय ४० वर्षे,रा. मानकापूर व फरहान फहीम वय १८ वर्षे,रा.कपिलनगर अशी आरोपींची नावे असून निशिकांत मूल याची मानकापूर परिसरात ‘मूल ॲकेडमी’ या नावाने शिकवणी वर्ग आहे.त्यात दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांसह जेईईची शिकवणी घेण्यात येते.त्यात बारा ते पंधरा विद्यार्थी शिकतात.चौकशीदरम्यान,अधिकाऱ्यांना असे आढळून आले की ज्या व्हाट्सॲप ग्रुपद्वारे प्रश्नपत्रिका प्रसारित केल्या गेल्या होत्या तो त्यानेच तयार केला होता.ग्रुप चालवण्यासाठी वापरलेला मोबाईल नंबर देखील त्याच्या नावाने नोंदणीकृत होता.दुसरा आरोपी फरहान फहीम हा एक विद्यार्थी आहे.तो व्हॉट्सॲप ग्रुपचा सदस्य आहे. विद्यार्थ्याने या व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रश्नपत्रिका पोस्ट केल्याची माहिती आहे.प्रकरणी सदर पोलिसांनी दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!