Thursday, July 16, 2026
Homeगडचिरोलीभर जंगलात बसने घेतला पेट….-आज सकाळच्या सुमारास आगीचे तांडव…..-गडचिरोली जिल्ह्यातील घटना…

भर जंगलात बसने घेतला पेट….-आज सकाळच्या सुमारास आगीचे तांडव…..-गडचिरोली जिल्ह्यातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/मुनिश्वर बोरकर

 गडचिरोली :- गडचिरोली व अहेरी डेपोच्या भंगार गाडयाने प्रवासी त्रासले आहेत.कधि गाडीचे टप्पर उडते तर पावसाळ्यात टपरातून पाणी गळते हे नेहमीचेच झाले असतांना आज दिनांक- १ मार्च ला सकाळी सात वाजताच्या सुमारास गडचिरोली आगाराची बस परतीच्या प्रवासात भर जंगलात पेट घेतल्यामुळे प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. गडचिरोली आगाराची बस मुलचेरा येथे हल्टिंग राहते. ती आज सकाळी परतीच्या प्रवासात घोट मार्गे सकाळीच निघाली असता भर जंगलात पेट घेतल्यामुळे प्रवासी घाबरले.चालकांनी सावधानता बाळगुन प्रवाश्यांना खाली उतरविले. त्यामुळे प्रवासी सुखरूप बचावले.एम एच ०७ सी ९३१६ क्रमांकाची बस ७ ते ८ प्रवाशी घेऊन गडचिरोली कडे निघाली होती.वाटेत घोट जंगल परिसरात एस.टी च्या इंजीनमधुन धुर निघताच ड्रायव्हर च्या लक्षात आले. त्यांनी बस थाबवून प्रवाशांना उतरविले व झाड्याच्या फांदीने आग विझविण्याचा प्रयत्न केला.परंतु इंजिन व समोरचा भाग जळून खाक झाला.गडचिरोली आगाराचे व्यवस्थापक यांना या विषयी विचारणा केली असता गाडीतील ब्यॉटरी मुळे बस जळाली मात्र प्रवासी सुखरूप आहेत.दुसऱ्या बस ची व्यवस्था केल्याचे सांगीतले.गडचिरोली आगारातील अश्या भंगार बस बंद कराव्या; अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!