Tuesday, September 1, 2026
Homeनागपूरप्रेमीयुगुलांनी पळून जाण्याचा बेत आखला अन् पळून जातांनाच सापडले..!

प्रेमीयुगुलांनी पळून जाण्याचा बेत आखला अन् पळून जातांनाच सापडले..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-प्रेमविरांनी घरून पळून जाण्याचा बेत आखला आणि ट्रेनचा सफर करू लागले.अश्यातच नेहमी नजरेसमोर दिसणारी आपली मुले कुठे गेलीत,या टेन्शनमध्ये आई-वडिलांनी खाणे पिणे सोडून दिले.शोध घेऊनही थांगपत्ता लागेनासा झाला.महत्वाचे म्हणजे, सर्वात जास्त काळजी ही मुलीकडील पित्यांनाच असते.त्यामुळे मुलीकडील कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.त्यानुसार यंत्रणा कामाला लागली आणि दोघेही प्रेमवीर ट्रेनचा सफर करीत ‘हम तो चले परदेस,हम परदेसी हो गये’ असे करीत ट्रेनच्या जनरल कोचमध्ये सापडले.तरुणी ही नागपूरच्या कळमन्यातील डिप्टी सिग्नल भागातील आहे.तर युवक हा नागपूरच्या शांतीनगरातील रहिवासी आहे.युवकाने युवतीला प्रेमजाळ्यात ओढले आणि लग्नाचे आमिष दाखवून तिला दोन दिवसांपूर्वी गुरुवारी ३ जुलैला घरून बोलवून घेतले.त्यानंतर दोघांनीही नागपूरच्या रेल्वे स्थानकावरून ट्रेन पकडली.ट्रेन नंबर १८२४० इतवारी-बिलासपूर-शिवनाथ एक्स्प्रेसमध्ये बसून दोघेही छत्तीसगडकडे निघाले.दरम्यान,मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर कळमना पोलिसांनी स्थानिक रेल्वे पोलिस तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना माहिती दिली. त्यानुसार,आरपीएफचे उपनिरीक्षक मोहम्मद मुगीसुद्दीन आपल्या दोन सहकाऱ्यांसह शिवनाथ एक्स्प्रेसमध्ये गस्त करतांना नमूद वर्णनाच्या मुला-मुलीचा शोध घेत होते.त्यांना ट्रेनच्या जनरल कोचमध्ये हे दोघेही दिसताच ताब्यात घेतले.प्राथमिक चौकशीत पळून गेलेले आणि कळमना ठाण्यात नोंद असलेले हे दोघे तेच असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रेमविरांना राजनांदगाव (छत्तीसगड) आरपीएफच्या हवाली करण्यात आले.पुढील प्रक्रिया पार पाडून दोघांनाही कुटुंबीयांकडे हवाली करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!