Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरप्राध्यापकाने पालकांना आणायला सांगितल्याने विद्यार्थ्यांचा राग अनावर; प्राध्यापकाची फोडली कार..

प्राध्यापकाने पालकांना आणायला सांगितल्याने विद्यार्थ्यांचा राग अनावर; प्राध्यापकाची फोडली कार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-व्यसनाच्या आहारी गेलेल्या बारावीच्या दोन विद्यार्थ्यांना प्राध्यापकाने कडक शब्दांत सूचना करून पालकांना शाळेत घेऊन या,अन्यथा वर्गात प्रवेश दिला जाणार नाही,असे म्हटल्याने दोघांनीही मनात राग धरून इतर साथीदारांच्या मदतीने प्राध्यापकाची कार फोडून लाखोचे नुकसान केल्याची घटना काल शनिवारी दुपारच्या सुमारास नागपूर जिल्ह्याच्या  सावनेर तालुक्यातील खापरखेडा येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात घडली.घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली तर शिक्षकवर्ग धास्तावले आहेत.सदर घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून प्रकरणी प्राध्यापकांनी खापरखेडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
खापरखेडा येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक सचिन कोरडे यांना काही विद्यार्थी शाळेत नशा करून येत असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार त्यांनी इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना आपल्या केबिनमध्ये बोलावून सज्जड इशारा देत पालकांना शाळेत घेऊन येण्यास सांगितले होते.पालकांना शाळेत बोलावण्याचा इशारा दिल्याने विद्यार्थ्यांनी मनात राग धरून चक्क मित्रांच्या मदतीने कारवर हल्ल्याची योजना आखली. काल शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास पाच युवक दोन दुचाकींवर शाळेच्या आवारात पोहचले आणि त्यांनी सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरा फोडला,नंतर प्रा.कोरडे यांच्या कारवर रॉडने प्रहार करीत पुढील,मागील आणि चारही दारांच्या काचा फोडल्या,तसेच छतावरही वार करून वाहनाचे मोठे नुकसान केले.तोडफोड केल्यानंतर पाचही जणांनी घटनास्थळावरून पोबारा केला.मात्र, परिसरात असलेल्या इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सदची घटना कैद झाल्याने आरोपींची ओळख पटवणे पोलिसांना सोपे झाले आहे.प्रकरणी प्राध्यापकांच्या तक्रारीवरून खापरखेडा पोलिस ठाण्याचे ठाणेदार हरीष रुमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!