- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यात एक भयावह घटना उघडकीस आली आहे.दुपारच्या सुमारास शेतावर गेलेला शेतकरी सायंकाळ होऊनही घरी परतला नसल्याने गावकरी व वन विभागाच्या पथकाने शोध घेतला असता तब्बल ५०० मीटर अंतरावर वाघाने फरफटत नेऊन पाहतात तो काय?शरीरावर वाघाच्या नखांच्या खोल जखमा आणि एका हाताचा भाग खाल्लेला आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.ईश्वर भरडे वय ५२ वर्षे, रा.शंकरपूर, ता.चिमूर,जि.चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.सदरची घटना काल बुधवारी शंकरपूर-आंबोली मार्गावरील ठाणा रीट परिसरातील शेतशिवारात सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.प्रकरणी गावकऱ्यांनी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

ईश्वर भरडे यांच्या शेतात कापसाच्या पिकाची लागवड करण्यात आली आहे.त्यामुळे काल बुधवारी दुपारच्या सुमारास कापसाचे पीक पाहण्यासाठी सायकलने एकटेच शेतावर गेले होते.सायंकाळ होऊनही ते घरी परतले नसल्याने कुटूंबीय तसेच काही नागरिकांनी
शेतावर जाऊन पाहणी केली असता त्यांची सायकल शेताजवळ दिसून आली.ईश्वर यांना आवाज दिला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.त्यामुळे संशय निर्माण झाला.लागलीच सायंकाळी गावातील युवक तसेच वनविभागाचे कर्मचारी मिळून शोध घेऊ लागले असता शेतात रक्ताचे डाग आणि फाटलेले कपडे आढळल्याने सर्वजण त्या दिशेने गेले.तब्बल अर्धा किलोमीटर अंतरावर थोड्या ईश्वर भरडे यांचा मृतदेह दिसून आला.पाहतात तो काय? त्यांच्या शरीरावर वाघाच्या नखांच्या खोल जखमा आणि एका हाताचा भाग खाल्लेला आढळून आला.प्रकरणी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.महत्वाचे म्हणजे,एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३८ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३६ वा बळी असल्याने यावर सरकारने उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
- Advertisement -

