Wednesday, September 23, 2026
Homeकोरचीपत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करणाऱ्या आरोपीस ३ दिवसांची पोलीस कोठडी…-कोरची तालुक्यातील घटना…

पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करणाऱ्या आरोपीस ३ दिवसांची पोलीस कोठडी…-कोरची तालुक्यातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 कोरची(गडचिरोली) :- घरगुती वादाचा राग मनात ठेऊन राहत्या घरात झोपून असलेल्या पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने सपासप तीन वेळा वार करून पत्नीची हत्या केल्याची घटना कोरची तालुका मुख्यालयापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या बेतकाठी येथे बुधवारी २९ मे रोजी पहाटे ३ वाजता दरम्यान घडली होती.या प्रकरणातील आरोपी रोहिदास बिरसिंग बंजारा (४०) रा.बेतकाठी याला ३ दिवस पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

अमरोतीन रोहिदास बंजारा (३३) रा.बेतकाठी असे मृतक पत्नीचे नाव आहे.बुधवारच्या पहाटे पत्नीला कुऱ्हाडीने ठार केल्यानंतर त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते.त्याला न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.पुढील तपास ठाणेदार चंद्रकांत वाबळे हे करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!