Saturday, August 8, 2026
Homeनवी दिल्लीदोघांच्या सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही...- सत्र न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने...

दोघांच्या सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही…- सत्र न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने दोषी ठरवलेल्या एका व्यक्तीची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :- दोघांच्या सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही,असा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.लग्नाचे आश्वासन देऊन विवाहित महिलेशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी दिल्लीतील सत्र न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने दोषी ठरवलेल्या एका व्यक्तीची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान, आरोपी व्यक्तीसोबत राहण्यासाठी महिलेने आपला पती आणि तीन मुलांना सोडले होते.तसेच, बलात्काराचा आरोप असलेली व्यक्ती देखील विवाहित होती.

दिल्लीत राहणाऱ्या नईम अहमदला उच्च न्यायालयाने सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. परंतु न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाने बलात्काराच्या आरोपातून त्याची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने नमूद केले की, अनेक कारणांमुळे सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बिघडल्यानंतर सतत महिलांकडून बलात्काराचा आरोप करण्यासाठी याचा वापर करतात.अहमदने लैंगिक संबंध ठेवण्याच्या हेतूने लग्नाचे वचन दिले होते, असा सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाने निष्कर्ष काढला होता, असे ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी महिलेची बाजू मांडताना सांगितले. तर दुसरीकडे, अहमदचे वकील राज के चौधरी यांनी सांगितले की, महिलेने मोठ्या रकमेची मागणी पूर्ण न केल्याने बलात्काराची तक्रार दाखल केली होती.दिल्लीत राहणाऱ्या नईम अहमदला उच्च न्यायालयाने सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. परंतु न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाने बलात्काराच्या आरोपातून त्याची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने नमूद केले की, अनेक कारणांमुळे सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बिघडल्यानंतर सतत महिलांकडून बलात्काराचा आरोप करण्यासाठी याचा वापर करतात.अहमदने लैंगिक संबंध ठेवण्याच्या हेतूने लग्नाचे वचन दिले होते, असा सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाने निष्कर्ष काढला होता, असे ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी महिलेची बाजू मांडताना सांगितले. तर दुसरीकडे, अहमदचे वकील राज के चौधरी यांनी सांगितले की, महिलेने मोठ्या रकमेची मागणी पूर्ण न केल्याने बलात्काराची तक्रार दाखल केली होती.दरम्यान, महिलेचे लग्न झाले असून तिला तीन मुले आहेत. पती आणि मुलांना सोडून ती २००९ मध्ये अहमदसोबत पळून गेली. त्यानंतर २०११ मध्ये एका मुलाचा जन्म झाला. यानंतर अहमदने लग्न टाळले. २०१२ मध्ये महिला अहमदच्या मूळ गावी गेली असता तो विवाहित असून त्याला आधीच मुले असल्याचे आढळून आले. तरीही, महिलेने २०१४ मध्ये आपल्या पतीला घटस्फोट दिला आणि पतीसोबत आपली तीन मुले सोडली. हे सर्व घडल्यानंतरही अहमदने संबंधित महिलेशी लग्न करण्याचे टाळले. त्यामुळे २०१५ मध्ये या महिलेने त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!