Tuesday, May 26, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज-अर्जुनी/मोरगाव महामार्गाची चाळण.. -आमदार रामदास मसरामांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर..

देसाईगंज-अर्जुनी/मोरगाव महामार्गाची चाळण.. -आमदार रामदास मसरामांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-सध्या स्थितीत देसाईगंज- अर्जुनी/मोरगाव या राज्य महामार्गाच्या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे.गेल्या अनेक कालावधीपासून रस्ता उखडीमुळे वाहनधारक,प्रवासी, शेतकरी तसेच विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.विशेष करून सर्वत्र अपघातांची मालिका उघडकीस येऊ लागल्याने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी तात्काळ दखल घेत नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारे कोणतेही गाऱ्हाणे ऐकून घेतले जाणार नाही.रस्त्यावर पडलेले खड्डे व उखडलेला भाग यामुळे अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागावर राहील,असे स्पष्ट करत आज, शुक्रवार २३ जानेवारी रोजी त्यांनी देसाईगंज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना धारेवर धरत सदर मार्गाची तात्काळ दुरुस्तीची कामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
देसाईगंज-अर्जुनी/मोरगाव मार्ग ग्रामीण भागास, जिल्हा व तालुक्याच्या मुख्य ठिकाणांशी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा राज्य महामार्ग आहे.या रस्त्यावरून शेतमाल वाहतूक,रुग्णवाहिका,शालेय वाहने तसेच सामान्य नागरिकांची ये-जा सातत्याने सुरू असते.त्यामुळे रस्त्याची गुणवत्ता आणि सुरक्षितता अबाधित ठेवणे प्रशासनाची जबाबदारी आहे,असे आमदार मसराम यांनी यावेळी ठामपणे सांगितले.तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या नव्हे तर टिकाऊ व दर्जेदार पद्धतीने दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले.केवळ खड्डे बुजवून काम थांबवू नये,तर संपूर्ण रस्त्याची तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी मजबुतीकरण व पुनर्बांधणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.यामुळे सदर मार्गाची दुरुस्ती होऊन वाहतूक सुरळीत होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मूलभूत सुविधांसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत राहू, असे आश्वासनही आमदार मसराम यांनी यावेळी दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन चिमुकल्या मुलींवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यात दोन अल्पवयीन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी तात्काळ...

नागपुरात वाहनांच्या चोऱ्या करायचे अन् लाखनीत विकायचे; तिघांना बेड्या..

उद्रेक न्युज  नागपूर :-भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात कार्यरत असलेल्या सराईत वाहन चोरांच्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखा युनिट-एकच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या...

विद्यार्थ्यांना आता कोरोना काळासारखेच ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळण्याची शक्यता.. – इंधन दरवाढीचा परिणाम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांना मोठा झटका देण्यास सुरुवात केली आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या दरात...

आता वाघही पडणार गोंधळात; हल्ला करायचा की नाही?..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-हल्ली सर्वत्र वाघांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.वाघ केव्हाही हल्ला करून जिविनिशी ठार करू शकतो.यासाठी भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात वाघांचे हल्ले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!