- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्य शासनाच्या ग्रामीण विकास यंत्रणांतर्गत घरकूल योजनेत कार्यरत ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे गत सहा महिन्यांपासून मानधन थकीत असल्याने अभियंत्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.वारंवार मागणी केल्यानंतरही मानधन मिळत नसल्याने ग्रामीण गृहनिर्माण संघटनेने बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.यामुळे घरकुल लाभार्थ्यांचे मिळणारे अनुदान थांबले आहे. विशेष म्हणजे,ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांच्या माध्यमातून घरकुल लाभार्थ्यांच्या कामांची फोटो काढणे,ती अपलोड करणे व पुढील हप्त्याची रक्कम वितरीत करणे व इतर कामे पार पाडली जातात. मात्र, कामबंद आंदोलनामुळे सर्व कामे ठप्प पडल्याने घरकुल लाभार्थीही संकटात सापडले आहेत.
ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांनी प्रधान सचिव एकनाथ डवले व जिल्हा प्रकल्प अधिकारी यांना पत्र देऊन मागील ६ महिन्यांचे थकीत मानधन देण्यात यावे,अशी मागणी केली होती.मात्र,अद्याप मानधन मिळण्याचे नावच घेत नाही.या अभियंत्यांनी गेल्या सात वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने अतिशय कमी मानधनावर ग्रामीण भागातील घरकूल योजनांसाठी परिश्रम केले आहेत,मात्र वारंवार मानधन विलंबामुळे आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व पंचायत समिती घरकूल विभागांतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांमध्ये केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना(ग्रामीण)सोबतच राज्यपुरस्कृत रमाई आवास,शबरी आवास योजना, यशवंतराव चव्हाण आवास योजना व इतर योजना राबविल्या जात आहेत.अश्यातच मागील सहा महिन्यांपासून मानधन थांबल्याने आता अभियंत्यांच्या आंदोलनाला तीव्र रूप आले आहे.
- Advertisement -

