Monday, August 10, 2026
Homeगडचिरोलीयेत्या रविवारी राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन..

येत्या रविवारी राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून येत्या,रविवार २५ जानेवारी रोजी १६ वा राष्ट्रीय मतदार दिवस जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली,मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी स्तरावर विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. निवडणूक विषयक जागृती निर्माण करण्याकरीता चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले असुन शाळा/महाविद्यालय स्तरावर आयोजीत करण्यात आलेल्या स्पर्धा गुणानुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावरील विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हा स्तरावर आयोजीत करण्यात आलेल्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
मतदान प्रक्रियेमध्ये युवा मतदारांचा सहभाग वाढावा व त्यांच्यात मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी जिल्हा स्तरावरील राष्ट्रीय मतदार दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे रविवारी दुपारी १२ वाजता करण्यात येणार आहे.
१६ व्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी ” My India My Vote” हा विषय(Theme)आयोगाकडून देण्यात आलेला आहे.राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून मतदारांना मतदानाबाबत शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे,असे प्र.उपजिल्हा निवडणुक अधिकारी,गडचिरोली यांनी कळविले आहे
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अचानक विजांचा लखलखाट; विज कोसळून महिलेचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या उत्तरा उत्तम थेर वय ४७ वर्षे या महिला गुराखीचा वीज कोसळून...

सर्पदंशग्रस्त चिमुकलीला नागपूरला हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी वय ११ वर्षे हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने...

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!