Friday, September 4, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंजच्या जवाहर वार्ड परिसरात बिबट्याचा धुमाकुळ…-बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा- इलियास खान 

देसाईगंजच्या जवाहर वार्ड परिसरात बिबट्याचा धुमाकुळ…-बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा- इलियास खान 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :-देसाईगंज शहरातील जवाहर वार्ड,कमलानगर आणि जुनी वडसा रोड परिसरात बिबट्याने बऱ्याच दिवसांपासून धुमाकुळ घातला आहे.शहराच्या जवाहर वार्डला लागून असलेल्या इटीयाडोह पाठ्बंधारे विभाग तसेच जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्या कार्यालय परिसरात  खुल्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात मोठ-मोठी झाडे तसेच झुडपी झाडे असल्याने बिबट्याने याच ठिकाणी आपले बस्तान सुरू केले आहे.बिबट्या रात्रीच्या वेळेस येऊन जवाहर वार्ड परिसरातील मोकाट कुत्रे आणि घरातील पाळीव प्राणी बिबट्या उचलून नेत आहे. मागील काही दिवसांपूर्वी झेन लॉन परिसरात बिबटयाचा वावर असलेले सि्सिटिव्ही विडिओ प्रसार माध्यमांवर वायरल झाले होते.अशातच जवाहर वार्ड येथील नागरिकांनी परिसरात बिबट असल्याचे फोटो वायरल केले आहेत.बिबट्याच्या वावर शहरात 

जवाहर वार्ड व कमलानगर येथील नागरिकांना  बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.त्यामुळे एखादे वेळेस अनुचित प्रकार घडू नये; याकरीता शहरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा; अशी मागणी समाजवादी पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष आणि पत्रकार इलियास खान यांनी वनविभागाकडे केले आहे,

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!