Sunday, April 19, 2026
Homeकुरखेडादगडी कोळसा घेऊन जाणाऱ्या चालत्या ट्रकने घेतला पेट.. - कोरची-कुरखेडा मार्गावरील घटना;...

दगडी कोळसा घेऊन जाणाऱ्या चालत्या ट्रकने घेतला पेट.. – कोरची-कुरखेडा मार्गावरील घटना; जीवितहानी टळली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-छत्तीसगडच्या चांपा येथून चंद्रपूरला दगडी कोळसा घेऊन जाणाऱ्या चालत्या ट्रकने पेट घेतला असल्याची घटना आज,मंगळवार ११ फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास कोरची-कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील जांभूळखेडा गावापासून १ कीलोमीटर अंतरावरील वळणावर घडली.चालकाने प्रसंगावधान साधत ट्रक घटनास्थळीच थांबविल्याने जीवितहानी टळली.
माहितीनुसार,पंकज जैन ट्रांसपोर्ट कंपनी चंद्रपूर यांच्या मालकीचा ट्रक क्रमांक-एमएच ३४ बिजी ३२९६ ने छत्तीसगडच्या चांपा येथून आज चंद्रपूरला दगडी कोळश्याची वाहतूक केली जात होती.वाहतूक सुरू असतांना कोरची ते कुरखेडा महामार्गावरील जांभूळखेडा गावापासून १ कीलोमीटर अंतरावरील वळणावर चालत्या ट्रकने अचानकपणे पेट घेतला.सदरची बाब ट्रक चालक शिवकूमार रा.चंद्रपूर याच्या लक्षात येताच ट्रक थांबवून आपात्कालीन क्रमांकावर संपर्क साधला.त्यानुसार कुरखेडा नगरपंचायत येथील अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले.कोळसा ज्वलनशील पदार्थ असल्याने सहजासहजी आग आटोक्यात येण्याचे नाव धरत नसल्याने देसाईगंजच्या अग्नीशमन दलास पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते.त्यातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने ट्रकचे टायर,डिझेल टैंक,वायरिंग व इतर साहित्य जळून खाक झाले होते.अखेर दूपारी १.३० वाजेच्या सुमारास ट्रक मधील दगडी कोळसा खाली पाडत आग आटोक्यात आणण्यात आली.मात्र,यामध्ये ट्रक मालकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!