Saturday, September 5, 2026
Homeभंडाराचक्क एमए प्रथम वर्षाच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थिनीच बनल्या पर्यवेक्षक... -...

चक्क एमए प्रथम वर्षाच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थिनीच बनल्या पर्यवेक्षक… – मोबाईलवर उत्तरे शोधून लिहिण्याचे प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील कांद्री येथे श्री संत गजानन महाराज प्रशासकीय महाविद्यालयात बीए प्रथम वर्षाच्या हिवाळी परीक्षेत अखेरच्या पेपरला मोबाईल वापरून २२ विद्यार्थी उत्तरपत्रिका सोडवित असल्याचा प्रकार शुक्रवारी पुढे आला होता. विद्यापीठाच्या भरारी पथकाने धाड घालून या सर्व विद्यार्थ्यांवर कारवाई केली होती.अशातच आता चक्क एमए प्रथम वर्षाच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थिनींनाच पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्याचा प्रताप येथील केंद्रप्रमुखाने केल्याचे पुढे आले आहे. महाविद्यालयात बीए ते एमए पर्यंत शिक्षणाची सोय आहे.त्यामुळे येथे विद्यापीठाने परीक्षा केंद्र दिले
असून केंद्र अध्यक्ष म्हणून त्याच महाविद्यालयातील प्राचार्य प्रशांत वासनिक हे जबाबदारी सांभाळत आहेत. केंद्राध्यक्ष या नात्याने त्यांनी नियमानुसार परीक्षा केंद्र चालविणे अपेक्षित होते; मात्र, याठिकाणी भलताच प्रकार उघडकीस आल्याने शिक्षणाचा बट्ट्याबोळ होऊ लागला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!