Tuesday, July 21, 2026
Homeगोंदियाग्रामसेवकांनी जन्म प्रमाणपत्रे तपासली अन् लग्नात विघ्नच आले..!

ग्रामसेवकांनी जन्म प्रमाणपत्रे तपासली अन् लग्नात विघ्नच आले..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-एखादा विवाह पार पाडण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते.लग्न मंडप,डेकोरेशन,डीजे व जेवणाच्या तयारीपासून ते काहींना जनम घुट्टीचीही तजवीज करावीच लागते; अन्यथा रुसवे-फुगवे यांना सामोरे जावे लागत असते.मात्र,बालविवाह करणे बाल प्रतिबंधक २००६ च्या कायद्यान्वये गुन्हा असून याचे अनेकजण उल्लंघन करतांना दिसून येतात.अश्याच प्रकारे लग्न मंडप सजला,डेकोरेशन झाले,डीजेच्या तालावर नाच-गाणे सुरू झाले,वऱ्हाडीही जमले आणि जेवणाची तयारीही झालेली होती.अश्यातच काही वेळातच लग्न लागणार तोच माहिती मिळाली बालक व बालिकेचे जन्म प्रमाणपत्र तपासा आणि ग्रामसेवकांनी दोघांचीही जन्म प्रमाणपत्रे तपासली.प्रमाणपत्रानुसार बालकाचे वय पूर्ण नसल्याचे लक्षात येताच लग्नात विघ्न आल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील चांदोरी खुर्द गावात काल सोमवारी सायंकाळी साडे सात वाजताच्या सुमारास घडली.प्रकरणी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनात दामिनी पथक, जिल्हा बाल संरक्षण कक्ष,चाइल्ड हेल्पलाइन,इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी व तिरोडा पोलिस यांच्या संयुक्ताने नियोजित बालविवाह थांबविण्यात आला. प्रसंगी बालविवाह केल्यामुळे होणारे दुष्परिणाम सर्वांना समजावून सांगण्यात आले.वय पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही,असे हमीपत्र आणि संमती पत्र बालकांच्या आई-वडिलांकडून आणि नातेवाइकांकडून लिहून घेण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!