Friday, May 1, 2026
Homeगडचिरोलीगोंडवाना गणतंत्र पार्टी चिमुर लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार-प्रशांतभाऊ मडावी

गोंडवाना गणतंत्र पार्टी चिमुर लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार-प्रशांतभाऊ मडावी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

संपादक/मुनिश्वर बोरकर

गडचिरोली :- होवू घातलेल्या चिमुर-गडचिरोली लोकसभा निवडणुक गोंडवाना गणतंत्र पार्टी स्वबळावर लढवणार असून कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही; असे नुकत्याच पार पडलेल्या गोंगपा जिल्हा गडचिरोली च्या जिल्हा कार्यकारणीत ठराव मंजुर करण्यात आला अशी माहीती गो.ग.पा जिल्हाअध्यक्ष प्रशांतभाऊ मडावी यांनी दिली. दि.१८/०३/२०२४ रोजी गोंडवांना गणतंत्रपार्टी च्या कोर कमिटीची बैठक प्रशांत शामकांन्त मडावी यांच्या घरी गोंगपा पार्टी कार्यालयात पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, सदर बैठकीत गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र हे गो.ग.पा स्वबळावर लढवणार आहेत हे सर्वानुमते ठरवण्यात आले. सदर बैठकीत.

जिल्हा अध्यक्ष प्रशांतभाऊ मडावी,जिल्हाउपाध्यक्ष डॉ. साईनाथ कोडापे,जिल्हा महामंत्री किशोर मात्लामी,जिल्हा महासचिव रमेश कोरचा सर,सतीश कुसराम, अ.भा.आ.वि.परिषदचे जिल्हाध्यक्ष कुणालभाऊ कोवे तथा गो.ग.पा तालुकाध्यक्ष वडसा क्रिष्णा उईके, धाणोरा ता. अध्यक्ष तुमरेटी, ता.उपाध्यक्ष धाणोरा नारायण सयाम, अमीत शेख ता. संघटक धाणोरा सहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.सन २००४ चे दरम्यान सिरोंचा विधानसभा ची निवडणुक गोंडवाना गणतंत्र पार्टी स्वतंत्रपणे निवडणुक लढविली होती त्यावेळेस राजे धर्मराव बाबा आत्राम हे बहुमतांनी निवडुन आले होते हे विशेष आजही आदिवासी हे गोंडवाना गणतंत्र  पार्टीसोबत उभे आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!