Wednesday, June 10, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा येथे 'योजना आपल्या दारी'... -आमदार कृष्णा गजबे यांच्या वतीने शासकीय योजनांची...

कोंढाळा येथे ‘योजना आपल्या दारी’… -आमदार कृष्णा गजबे यांच्या वतीने शासकीय योजनांची अंमलबजावणी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(देसाईगंज):-राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या वतीने देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे ‘योजना आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज चौक ग्रामपंचायत व्यासपीठ येथे विविध योजनेच्या शिबिराचे आयोजन काल,५ सप्टेंबर रोजी करण्यात आले.सदर शिबिराचे उद्घाटन गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती रोषानिताई पारधी यांच्या हस्ते करण्यात आले.
‘योजना आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून सदर शिबिरात मुख्यमंत्री वयोश्री योजना,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना,मुख्यमंत्री तीर्थ दर्शन,मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना व इतर विविध योजनांची  गावातील नागरिकांना माहिती देत एकूण ३५५ लाभार्थी योजनेचे फॉर्म भरण्यात आले.यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे ३४१,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे २,मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे १०, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे २ इतके लाभार्थी फार्म भरून घेण्यात आले.यावेळी देसाईगंज भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पारधी,रोशन ठाकरे,बंडू बोरुले,गजानन सेलोटे कोंढाळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच,गोकुल ठाकरे ग्रामपंचायत सदस्य,प्रतिष्ठित नागरिकपंढरी नखाते,सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,नामदेव पारधी,पुंडलिक बुराडे, बाबुराव राऊत,अरुण दुपारे,जयानंद बुल्ले सह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!