- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-भरधाव वेगात असलेली कार अनियंत्रित होऊन तीन ते चार वेळा उलटली आणि तब्बल ५० फूट अंतरावर फरफट जात रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन धडकली.यात २३ वर्षीय तरुणाच्या डोक्याला गंभीर मार लागून घटनास्थळीच मृत्यू झाला,तर सहकारी मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना काल शनिवारी दुपारच्या सुमारास गोरेगाव-कोहमारा मार्गावरील मुरदोली गावाजवळ घडली.रुपेश नरेश भोगारे वय २३ वर्षे,रा.पिंडकेपार,ता.गोरेगाव,जि.गोंदिया असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे,तर २३ वर्षीय प्रफुल पटले रा.तुमखेडा ता.गोरेगाव असे जखमीचे तरुणाचे नाव असून दोघेही चांगले मित्र आहेत.
काल शनिवारी दुपारच्या सुमारास रुपेश व प्रफुल हे दोघेही एमएच ३५ एजी ३९५८ क्रमांकाच्या कारने गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव येथून कोहमाराच्या दिशेने निघाले होते.कार भरधाव वेगात असल्याने कोहमारा मार्गावरील मुरदोली गावाजवळ येताच चालकाचा गाडीवरील ताबा सुटला.ताबा सुटताच कार तीन ते चार वेळा उलटली आणि मुख्य रस्त्यापासून तब्बल ५० फूट अंतरावर फरफट जात रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन जोरदार आपटली.यात कार पूर्णपणे क्षतिग्रस्त होऊन कारमधील रुपेशच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर प्रफुल गंभीर जखमी झाला.कार झाडावर धडकण्यापूर्वी तीन ते चार वेळा उलटल्याचे मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांनी प्रत्यक्ष बघितले होते.घटना घडताच मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेत मदतकार्य सुरू करून घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना दिली.माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून जखमी प्रफुलला तात्काळ गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.लागलीच पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून रुपेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवून पुढील तपास सुरू केला आहे.अवघ्या २३ वर्षाच्या तरुणावर काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

