Friday, June 19, 2026
Homeकोरचीआरमोरी विधानसभा काँग्रेस कमिटीची 'जनसंवाद परिवर्तन यात्रा' कोचीनारा गावात.. -रामदास मसराम यांनी...

आरमोरी विधानसभा काँग्रेस कमिटीची ‘जनसंवाद परिवर्तन यात्रा’ कोचीनारा गावात.. -रामदास मसराम यांनी ग्रामस्थांशी हितगुज साधत जनसंवादाद्वारे गावकऱ्यांच्या जाणून घेतल्या समस्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोरची(गडचिरोली):-शेतकरी,युवक,महिला, व्यापारी, विद्यार्थी व इतर अशा अनेक गोर-गरीब, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचे निराकरण तथा गाऱ्हाणी ऐकून प्रश्र्ने मार्गी लावण्याच्या उद्देशाने आरमोरी विधानसभा काँग्रेस कमिटी तर्फे ‘जनसंवाद परिवर्तन यात्रा’ गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातून सुरू करण्यात आली आहे.कोरची तालुक्यात काँग्रेस कमिटीचे कोरची तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल व तालुका काँग्रेस कमिटी कुरखेडाचे तालुकाध्यक्ष जीवन नाट यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू आहे.जनसंवाद परिवर्तन यात्रेच्या तिसऱ्या दिवशी कोरचीच्या मौजा-कोचीनारा ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली.या सभेला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास मसराम यांनी ग्रामस्थांशी हितगुज साधत जनसंवादाद्वारे गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा आणि त्यावर उपाययोजना करण्याचा निर्धार केला.
प्रसंगी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष
रामसुराम काटेंगे,देसाईगंज पं.स.चे माजी सभापती परसराम टिकले,रूपराम देवांगन उपसरपंच कोचीनारा,कांताराम जमकातन ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ता,समशेर खान पठाण,रघुराम देवांगन लालदास देवांगन,किशोर कराडे,वामन नंदेश्वर, भीमराव कराडे,भगवाना सोनकुसरा,पंचराम जमकातन,सखीलाल बागडेहरिया व परिसरातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!