- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भिवापूर(नागपूर):-अपडाऊन करणाऱ्या शालेय विद्यार्थिनींची छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत,अटक केलेल्या विकृत तरुणाची नागपूर येथील सत्र न्यायालयाने काल,रविवारला २२ सप्टेंबर रोजी थेट तुरुंगात रवानगी केली.त्यामुळे शहरातील ‘सडक छाप रोमिओं’वर ‘खाकी’चा काहीसा धाक बसला आहे.
मंगेश भालचंद्र धनविजे वय ३७,रा.कोलारी, ता. भिवापूर असे आरोपी असलेल्या विकृत तरुणाचे नाव आहे.अश्लील शिवीगाळ व हातवारे इशारे आणि पाठलाग केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध अल्पवयीन मुलींचा विनयभंग आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करीत,शनिवारला त्याला अटक केली होती.त्यानंतर काल,रविवारला पोलिसांनी आरोपीला नागपूर येथील विशेष सत्र न्यायालयापुढे हजर केले असता,न्यायालयाने त्याची रवानगी थेट तुरुंगात केली. आरोपी मंगेश विवाहित असून,तो नोकरीनिमित्त पत्नी व मुलाबाळासह बुटीबोरी येथे वास्तव्यास होता. वर्षभरापूर्वी पत्नी त्याला सोडून निघून गेली.त्यामुळे मंगेश आपल्या गावी कोलारीला परत आला. तेव्हापासून तो विचित्र वागत असल्याचे कळते. जोराजोरात ओरडणे,गाणे म्हणणे,अश्लील शिवीगाळ करणे,असे प्रकार त्याच्याकडून सतत सुरू असतात. गत महिनाभरापासून तर त्याने गावातून अपडाऊन करणाऱ्या शालेय विद्यार्थिनींना टार्गेट केले होते. त्यामुळे पालकांसह मुली दहशतीत होत्या.आता त्याची रवानगी तुरुंगात झाल्याने मुलींनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
- Advertisement -

