Tuesday, April 28, 2026
Homeनागपूरआता वाहतूक पोलिसांना दिलेल्या मशीनद्वारेच करावे लागणार ई-चलान..

आता वाहतूक पोलिसांना दिलेल्या मशीनद्वारेच करावे लागणार ई-चलान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एखाद्या मार्गावरून वाहनाने जात असतांना वाहतूक पोलीस दिसले की,अनेक वाहनधारकांच्या मनात धडकी भरत असते.त्याचे कारणही तसेच आहे.कुणाकडे लायसेन्स असते तर इन्शुरन्स नसते,एक ना एक कमी असल्याने वाहतूक पोलीस वाहन थांबवतात व चलान फाडून आर्थिक भुर्दंड बसवीत असतात.अश्यातच काहीजण झंझट नकोच,या उद्देशाने सुसाट वाहने पळवून वाहतूक पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढतात.त्यामुळे एखादेवेळी वाहतूक पोलीस कर्मचारी स्वतःच्या खासगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढतात व ई-चलान करतांना दिसून येतात.मात्र,आता कोणत्याही वाहतूक पोलिसाने झाडामागे किंवा कोपऱ्यात उभे राहून स्वतःच्या खासगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढले आणि ई-चलान केले तर अश्यांवर कारवाई करण्यात येईल,असे पोलिस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांनी स्पष्ट केले आहे.त्यानुसार पोलिसांना दिलेल्या मशीनद्वारेच त्यांना ई-चलान करता येणार आहे.काही वाहतूक पोलिस नियम तोडणाऱ्यांचे मोबाईलने फोटो काढत असल्याचे दिसून आले आहे.अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी याअगोदरच असे करू नये,असे दिशानिर्देश जारी केले होते.आता परत याबाबत अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंखे यांनी सूचना जारी केल्या आहेत. काही वाहतूक पोलिस वैयक्तिक मोबाईल फोन वापरून वाहनांचे फोटो काढायचे व ई-चलान सिस्टीममध्ये अपलोड करायचे.असा प्रकार नियमांचे उल्लंघन करण्याचा आहे.वरिष्ठ पातळीवरून निर्देश आल्यावर आम्ही सर्वांना याचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे.मात्र, तरीदेखील कुणी वाहतूक पोलिस असे करत असेल तर त्वरित अधिकाऱ्यांना कळवावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारखान्यात आढळून आले बालकामगार; संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी कंपनी असो वा कुठलेही दुकान, हॉटेल,ढाबे,चहाची दुकाने वा इतर आस्थापनांमध्ये बालकांना कामावर ठेवणे गंभीर गुन्हा आहे.यात १४ वर्षे वयाखालील मुलांचा...

आता लग्न पत्रिकेवर टाकावी लागणार जन्मतारीख..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अजूनही विशेषतः ग्रामीण आणि काही दुर्गम भागात छुप्या पद्धतीने बालविवाह लावले जातात.अनेकदा मुलगी अल्पवयीन असतांनाही तिचे लग्न लावून...

उन्हाचा तडाखा; फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरण व ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीच्या वेळेत तात्पुरता बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढलेल्या उष्माघाताच्या घटनांचा विचार करता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण(फिटनेस सर्टिफिकेट रेनेवल)तसेच पक्की अनुज्ञप्ती(ड्रायव्हिंग लायसन्स)चाचणीच्या...

३० वर्षीय महिलेची दिराने धारदार शस्त्राने गळा चिरून केली हत्या; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात आज,सोमवार २७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास एक भयावह आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली.नात्यातील दिरासोबत विवाह समारंभासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!