Thursday, April 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता ग्रामपंचायत,नगरपरिषदेत नाही; तर आरोग्य केंद्रात होणार जन्म-मृत्यूची नोंद..

आता ग्रामपंचायत,नगरपरिषदेत नाही; तर आरोग्य केंद्रात होणार जन्म-मृत्यूची नोंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-प्रशासनाने अमलात आणलेल्या ‘घटना तिथे नोंद’ प्रणाली मुळे अनेक ग्रामपंचायतीवरील जन्म-मृत्यू नोंद करून प्रमाणपत्र देण्याच्या कार्याचा बोझा कमी झाला आहे.पूर्वी १९३७ ते १९५७ साली कोतवाल पंजीद्वारे जन्म-मृत्यू नोंदी होत होत्या.त्यानंतर सन १९५७ ते १९६९ मध्ये जन्म-मृत्यू नोंद करण्याचे अधिकार जनपथ सभेला देण्यात आले.जन्म मृत्यू अधिनियम १९६९ नुसार ग्रामसेवकाला निबंधकाचा दर्जा देण्यात येऊन ग्रामपंचायत मार्फत जन्म-मृत्यू नोंद व दाखले जनतेस देण्यात येत होते.
सन १९६९ ते २०१७ पर्यंत जन्म मृत्यू नोंद करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीकडे होते.त्यात प्रशासनाकडून २०१७ ला (सीआरएस) नागरी नोंदणी प्रणाली सुरू करण्यात आली.परंतु या प्रणालीत सन २०२४ पर्यंत आयडी तयार झाल्या नसल्याने जन्म मृत्यू नोंदीचे अधिकार ग्रामपंचायतींकडेच होते.आता मात्र, हे अधिकार प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आले असून वैद्यकीय अधिकाऱ्याला निबंधकाचा दर्जा देण्यात आला आहे.त्यानुसार आरोग्य केंद्रात होणाऱ्या जन्म-मृत्यू घटनेची नोंद करून प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे अधिकार वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!