Monday, July 13, 2026
Homeगडचिरोली२७ वर्षीय नक्षली वरुण सह २४ वर्षीय महिला नक्षली रोशनीचे आत्मसमर्पण.. -योजना...

२७ वर्षीय नक्षली वरुण सह २४ वर्षीय महिला नक्षली रोशनीचे आत्मसमर्पण.. -योजना सुरु झाल्यापासून ६७४ नक्षल्यांनी केले आत्मसमर्पण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-२०२२ पासून आतापर्यंत २७,तर २००५ मध्ये आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून ६७४ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे.अशातच आज, सोमवारी १४ ऑक्टोंबर रोजी शासनाने ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेला नक्षली वरुण राजा मुचाकी उर्फ उंगा उर्फ मनिराम उर्फ रेंगू वय २७ वर्षे आणि शासनाने २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेली नक्षली त्याची पत्नी रोशनी विजया वाच्छामी वय २४ वर्षे यांनी केंद्रीय राखीव दल व गडचिरोली जिल्हा पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.
वरुणची पत्नी रोशनी ही भामरागड तालुक्यातील मल्लमपोडूर येथील रहिवासी आहे.२०१५ मध्ये ती छत्तीसगडमधील राही दलममध्ये भरती झाली. दुसऱ्याच वर्षी तिची भामरागड दलममध्ये बदली झाल्यानंतर ती तेथे २०१७ पर्यंत कार्यरत होती.पुढे अहेरी दलम,गट्टा दलममध्ये काम केल्यानंतर पुन्हा भामरागड दलममध्ये तिची बदली करण्यात आली. आजतागायत ती तेथे कार्यरत होती.तिच्यावर चकमकीचे १३ आणि अन्य १० अशा एकूण २३ गुन्ह्यांची नोंद असून,शासनाने तिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
वरुण मुचाकी हा छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यातील पिडमिली येथील मूळ रहिवासी आहे. २०१५ मध्ये तो छत्तीसगड राज्यातील कोंटा एरिया दलममध्ये भरती झाला.त्यानंतर २०२० पर्यंत त्याने दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य गिरीधरचा अंगरक्षक म्हणून काम केले.त्यानंतर त्याची भामरागड दलममध्ये बदली झाली.२०२२ पर्यंत तो भामरागड दलमचा उपकमांडर आणि नंतर कमांडर झाला. सद्य:स्थितीत तो कमांडर म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे १० आणि इतर ५ असे एकूण १५ गुन्हे दाखल असून,शासनाने त्याच्यावर ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
नक्षल्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात यावे; असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील,उपमहानिरीक्षक अंकित गोयल,केंद्रीय राखीव दलाचे पोलिस उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा,गडचिरोली पोलिस अधीक्षक नीलोत्पल,केंद्रीय राखीव दलाच्या ३७ बटालियनचे कमांडंट दाओ किंडो आत्मसमर्पणाची प्रक्रिया प्रसंगी उपस्थित होते.
.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!