- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-केंद्रीय लोकसेवा आयोगाने(युपीएससी)घेतलेल्या वर्ष-२०२५ च्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल आज,शुक्रवार ६ मार्च रोजी जाहीर करण्यात असून देशातील एकूण ९५८ उमेदवार यशस्वी झाले आहेत.यशस्वी उमेदवारांमध्ये महाराष्ट्र राज्यातील तब्बल ६० हून अधिक उमदेवारांचा समावेश आहे.यशस्वी उमेदवार हे भारतीय प्रशासन सेवा(आयएएस),भारतीय विदेश सेवा(आयएफएस),भारतीय पोलीस सेवा (आयपीएस),केंद्रीय सेवा गट-अ,ब इत्यादी पदांवर विराजमान होणार आहेत.विशेष म्हणजे,केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी ऑगस्ट २०२५ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती.डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या व आज शुक्रवारी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.यात राजस्थान मधील अनुज अग्निहोत्रीने टॉप केले आहे.सिव्हील सर्व्हिसेसमध्ये त्याने टॉप केले आहे.अनुज हा मेडीकल क्षेत्रातील विद्यार्थी आहे.अनुजने अखिल भारतीय स्तरावर प्रथम क्रमांक(AIR १) पटकावला आहे.राजेश्वरी सुवे एम ही दुसऱ्या स्थानी आली आहे,तर आकांश धूल याने तिसरे स्थान पटकावले आहे.तर महाराष्ट्र राज्यातील ६० हून अधिक उमदेवारांच्या निकालात पहिल्या शंभर उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे.ऋषीकेश आलासे ६१,आकाश त्रिवेदी यांनी ७३, गौरव चोपडा यांनी ८३, सायली पगार यांनी ८७ वा तर दिक्षा पाटकर यांनी ८८ वा क्रमांक पटकावला आहे.
- महाराष्ट्र राज्यातील पात्र उमेदवार व त्यांनी पटकावलेला क्रमांक👇
ऋषिकेश आलासे(६१),आकाश त्रिवेदी (७३),गौरव चोप्रा(८३),सायली पगार (८७), दीक्षा पाटकर (८८), ऋतुजा गायकवाड (१०६), वरुण टोकस (११७), अंकिता अनिल पाटील (१४०),आर्यन सिरसीकर (१७५),कार्तिक बच्छाव (१७७),राहुल पाटील (२२४), शुभम शरद बेहेरे (२२६), ऋषिकेश पालिमकर (२८३), मोहिनी जगताप (३२३), अभिषेक ओझार्डे (३३६), हर्षवर्धन पाटील (३४९), हर्षवर्धन तिडके (३५५), कुणाल अहिरराव (४३०), अभिषेक मगदूम (४४९),धनश्री अहिरे (४८९), मनोज पाटील (४९३), विशाखा कदम (५०४), नंदिनी पाटील (५१२), रजत वाळके (५१४), निखिल तांबे (५१७), श्रुती चव्हाण (५२७), धनंजय दिघे (५२९), संकेत कुंभार (५३९), साईराज पाटील (५४५), आरुषा पाटील (५५३), पारस मिस्त्री (५५५), बापूसाहेब गायकवाड (५६१), प्रवीण कोळपे (५८४), अविष्कार डेर्ले (५९१), रोहित माळवेकर (६०१), अभिषेक टेकाडे (६१०), सिद्धार्थ तागड (६१९), भाग्यश्री नायकेले (६४७), शिवम वखारे (६५१), पांडुरंग कांबळी (६६०), अश्विनी कोळेकर (६७५), प्रज्वल नासरे (६७७), अल्पेश ढवळे (६८७), सूरज सूर्यवंशी (७०२), रामेश्वर शिंदे (७०५), बसवराज पाटील (७३९), प्रीतकुमार भाले (७४२), राजश्री देशमुख (७५४), चेतन ठाकरे (७६२), प्रांजली मेश्राम (७६७), मनीष झेंडे (७८८), प्रथमेश शिंदे (८१७), राहुल चांडोलकर (८३१), हेमकृष्ण पिसाडे (८४९), अतुल राजुरकर (८६३), रोहित सांगळे (८६५), सुरेश बोरकर (९१२), प्रेरणा खवले (९१३), अनिकेत अहिरे(९४१).
- Advertisement -

